शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

गोंदियाच्या अनिकेतचा आयआयटी खरगपूरमध्ये संशयास्पद मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:17 IST

वसतिगृहात आढळला मृतदेह : कुटुंबीयांवर मोठा आघात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील कुंभारेनगर येथील रहिवासी असलेला अनिकेत वालकर हा खरगपूर आयआयटी वसतिगृहात राहून शिक्षण घेत होता. २० एप्रिल रोजी अनिकेतचा मृतदेह तो राहत असलेल्या वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद स्थितीत आढळून आला. या घटनेमुळे अनिकेतच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. 

अनिकेत हा लहानपासूनच हुशार होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोंदियातील एका खाजगी शिकवणीतून त्याने जेईईचा अभ्यासक्रम प्रावीण्य सूचित उत्तीर्ण करून थेट आयआयटी खरगपूर गाठले होते. तेथे नुकत्याच झालेल्या कॅम्पस मुलाखतीत त्याला २४ लाखांच्या पॅकेजची नोकरी सुद्धा मिळाली होती.

सोमवारपासून (दि. २१) सुरू होणाऱ्या परीक्षेनंतर तो नोकरीवर रुजू होणार होता. पण, अचानक वालकर कुटुंबाला रविवार, दि. २० एप्रिल रोजी अनिकेतचा मृत्यू बातमी मिळाली आणि संपूर्ण वालकर कुटुंब हादरून गेले. या बातमीवर त्याच्या कुटुंबीयांचा विश्वासही बसत नव्हता. दरम्यान, गोंदिया येथील घरी असलेला मोठा भाऊ, आई आणि वहिनीने स्वतःला सावरून ही बातमी कुटुंबातील अन्य सदस्यांना सांगितली. माहिती मिळाल्यानंतर भाऊ, आतेभाऊ आणि आई अनिकेतचा मृतदेह आणण्यासाठी आयआयटी खरगपूर येथे गेले. बुधवारी (दि. २३) ते गोंदियाला येणार असल्याची माहिती अनिकेतचे काका धनंजय वालकर यांनी दिली.

मोठ्या भावासह ती भेट ठरली अखेरचीअनिकेत वालकर (२२) हा महासागर अभियांत्रिकी आणि नौदल वास्तुकला विभागातून दुहेरी पदवी घेत होता. २१ एप्रिलपासून त्याची शेवटच्या सत्राची परीक्षा सुरू होणार होती. तो एक आदर्श विद्यार्थी होता व त्याला इंटर्नशिप मिळाली होती. विशेष म्हणजे १७एप्रिलला आयआयटी-खरगपूर येथे एका फेअरवेल कार्यक्रमात त्याने आपल्या मोठ्या भावाला या कार्यक्रमासाठी बोलावले होते. त्याचा मोठा भाऊ सुदीप वालकर हा अनिकेतला भेटून शनिवारी (दि. १९) गोंदियाला परत आला.

कुटुंबीयांना संशयअनिकेत वालकरचा मृतदेह खरगपूर येथील वसतिगृहात संशयास्पद स्थितीत आढळला. विशेष म्हणजे घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच अनिकेतचा मोठा भाऊ त्याला भेटून आला होता. तेव्हा अनिकेत कुठल्याही तणावात नव्हता. मात्र यानंतर त्याच्या मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबीयांना सुध्दा त्याच्या मृत्यूबदल संशय आहे.

कोरोनात हरपले वडिलांचे छत्रअनिकेतच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले. त्यामुळे आई, भाऊ आणि काका धनंजय वालकर यांच्या मार्गदर्शनात अनिकेत शिक्षण घेत होता. अनिकेतच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

खरगपूर प्रशासनाने दिली कुटुंबीयांना माहितीवालकर कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत दीपक वालकर हा आयआयटी-खरगपूर येथे चौथ्या वर्षाचा पदवीधर विद्यार्थी होता. आयआयटी-खरगपूरच्या जेसी बोस हॉल ऑफ रेसिडेन्समधील त्याच्या खोलीत रविवारी संध्याकाळी अनिकेतचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला, अशी माहिती आयआयटी-खरगपूर प्रशासनाकडून रविवारी वालकर कुटुंबीयांना देण्यात आली.

टॅग्स :gondiya-acगोंदिया