लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण २८८ जणांचे स्वॅब नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यापैकी २४२ जणांच्या स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून हे सर्व नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहे. तर ४६ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप जिल्हा आरोग्य विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त व्हायचा आहे.जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये जिल्हा कोरोनामुक्त राहवा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे मागील २५ दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधीत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात मागील २५ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे. राज्यात केवळ सहा जिल्हे ग्रीन झोनमध्ये असून त्यामध्ये गोंदियाचा समावेश आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग व पोलीस विभागाने जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोर पावले उचलल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला नाही.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून थोडी लक्षणे दिसताच त्यांना शासकीय क्वारंटाईन कक्षात दाखल करुन उपचार केले जात आहे. सध्या जिल्ह्यातील सात क्वारंटाईन कक्षात ९६ व्यक्ती उपचार घेत आहेत. यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल ४६, एम.एस.आयुर्वेदिक कॉलेज गोंदिया १७, चांदोरी ७, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट नगर परिषद तिरोडा ५, समाज कल्याण निवासी शाळा डव्वा ६, शासकीय आश्रमशाळा इळदा १० आणि बिरसी उपकेंद्र येथे ५ अशा एकूण ९६ व्यक्तींचा समावेश आहे.जिल्ह्यातील एक जण छत्तीसगडमध्ये आढळला पॉझिटिव्हगोंदिया जिल्ह्यातील एक रहिवासी छत्तीसगड येथे कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या हा रुग्ण छत्तीसगडमध्ये असून तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहे. तर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे सदर रुग्णाच्या कुटुंबातील चारही सदस्यांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
२४२ जणांचे स्वॅब नमुने निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 5:00 AM
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये जिल्हा कोरोनामुक्त राहवा यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. त्यामुळे मागील २५ दिवसात जिल्ह्यात कोरोना बाधीत एकही नवीन रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यात मागील २५ दिवसांच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये केला आहे.
ठळक मुद्दे९६ जण क्वारंटाईन कक्षात : ४६ स्वॅब नमुन्याच्या अहवालाची प्रतीक्षा,कोरोना उपाययोजना