शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

चापटीतील दारुबंदीच्या लढ्याने घेतला वेग

By admin | Published: October 11, 2015 12:56 AM

जवळच्या चापटी या गावात गेल्या अनेक दिवसांपासून दारुबंदीसाठी गावकऱ्यांचा लढा सुरू आहे.

महिला-युवकांचा सहभाग : ठरावासह समितीही गठितबाराभाटी : जवळच्या चापटी या गावात गेल्या अनेक दिवसांपासून दारुबंदीसाठी गावकऱ्यांचा लढा सुरू आहे. ९ आॅक्टोबरला तंटामुक्त समितीच्या अनुषंगाने गावकऱ्यांनी विशेष सभा घेऊन दारुबंदीसाठी ठराव केला. यासाठी समितीही गठीत करण्यात आली. त्यामुळे हा लढा आता वेग घेत असल्याचे दिसून येते.या सभेला जवळपास ५०० युवक, नागरिक, महिला व गावातील पदाधिकारी उपस्थित होते. सभेला पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगावचे दोन शिपाई सुद्धा हजर होते. आतापर्यंत पोलीस शिपाई कधीच अशा सभांना येत नव्हते. या सभेत फक्त दारुबंदी या विषयावरच चर्चा घेण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत चापडी गावात दारुबंदी झालीच पाहिजे असे प्रत्येक गावकऱ्याचे स्पष्ट मत होते.गावामध्ये गावकऱ्यांनी ६ फेब्रुवारी २०१४ या दिवशी दारु पकडून दिली होती. परंतु दारु विक्रेत्यांवर कारवाई न होता उलट दारु पिणाऱ्या इसमावर पोलिसांनी कारवाई केली, अशी उलट मदत गावकऱ्यांना पोलिसांकडून मिळण्याचा अनुभव आहे.अशा कारणामुळे दारु विक्रेते वरचढ होऊन बोलू लागतात, असे गावकरी म्हणतात. पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरगावची मदत बरोबर मिळत नाही. गावकरी मोठ्या संख्येने सभेला हजर राहू नये म्हणून काही लोकांनी संपूर्ण गावात माहिती दिलीच नाही. तरीही मोठ्या संख्येने लोक हजर होते. गावात दारुबंदी व्हावी म्हणून ५२ नागरिकांची समिती गठित करुन बंदीबाबत ठराव लिहीण्यात आला. गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. दारु पकडून देणाऱ्याला १ हजार १ रुपये देण्यात येणार आहेत. गावामध्ये दारुबंदीचे पत्रक, नोटीस, बॅनर लावण्यात येणार आहेत. दारुबंदीसाठी गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे सर्व पदाधिकारी आणि पोलीस विभागाचे सहकार्य लागणार आहे. गावातील स्वयंसेवकांचाही यात सहभाग राहील, यावरही चर्चा झाली. (वार्ताहर)