थलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : देशात पेट्रोल डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किमतीमुळे महागाईच्या दरात सतत वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. या दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात शुक्रवारी (दि.२५) दुपारी १ वाजता स्थानिक गांधी प्रतिमा चौकातून वाहनाची प्रतिकात्मक प्रेतयात्रा व सायकल रॅली काढण्यात आली.यात सहभागी सर्वसामान्य नागरिकांनी सरकारच्या धोरणांचा तीव्र शब्दात निषेध नोंदविला.स्थानिक गांधी प्रतिमा चौकातून दुपारी १ वाजता खा. पटेल यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर सायकल रॅली व वाहनाच्या प्रतिकात्मक प्रेत यात्रेला सुरूवात झाली.यावेळी उपस्थित नागरिकांनी रॅलीच्या माध्यमातून तीव्र शब्दात रोष व्यक्त करीत केंद्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर सायकल रॅली व प्रतिकात्मक प्रेतयात्रेला सुरूवात झाली.ही सायकल रॅली आंबेडकर चौकात पोहचली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला खा. पटेल यांनी माल्यार्पण केले. त्यानंतर सिव्हिल लाईन परिसरातील उपविभागीय कार्यालयाजवळ प्रतिकात्मक प्रेतयात्रा व सायकल रॅली पोहचली.सरकारने पेट्रोल, डिझेलची केलेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी. या मागणीचे निवेदन खा.पटेल यांच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांना देण्यात आले. खा. पटेल हे स्वत: सायकल चालवित रॅलीत सहभागी झाल्याने या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले होते.रॅलीत माजी. आ. राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, शिव शर्मा, गप्पु गुप्ता, भैय्यू चौबे, विनोद हरिणखेडे, हरगोंविद चौरासीया, निखिल जैन, केतन तुरकर, सोनू बिहारी, लखनसिंह बिहिरीया यांच्यासह सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.पेट्रोल, डिझेलच्या किंमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.जीएसटीएस व सरकारच्या चुकीच्या कर प्रणालीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा पेट्रोल, डिझेलचे दर प्रती बॅरेल १४० रुपये होते. तर आता हे दर ८० प्रती बॅरेल असून सुध्दा पेट्रोलचे दर प्रती लिटर ८६ रुपयांच्यावर गेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांवर दिवसेंदिवस बोजा वाढत आहे. याच सर्व गोष्टींचा निषेध नोंदविण्यासाठी ही प्रतिकात्मक प्रेत यात्रा व सायकल रॅली काढण्यात आली.- प्रफुल्ल पटेल, खासदार.
प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून केला पेट्रोल दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:13 AM
देशात पेट्रोल डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किमतीमुळे महागाईच्या दरात सतत वाढ होत असून त्याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे.
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल यांचे नेतृत्त्व : उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन