लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : शिक्षकांना देशद्रोही म्हटल्याबद्दल नामदेव जाधव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आमगाव शाखेच्या वतीने आमगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नावे सहायक निरीक्षक एस.जी.घोरपडे यांना देण्यात आले.देशाचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकांना देशद्रोही संबोधणाऱ्या व शिक्षकांबद्दल आपत्तीजनक वक्तव्य करणाºया प्रा.नामदेव जाधव यांचा निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी शिक्षक समितीने या वेळी केली.शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष डी.व्ही. बहेकार, संचालक एन.बी.बिसेन, सरचिटणीस संदीप मेश्राम, तालुका नेते के.टी. कारंजेकर, कार्याध्यक्ष बी.एस.केसाळे, शरद उपलपवार, आनंद येरणे, रामेश्वर बागडे, दिलीप होटे, एस.एफ.येटरे, सुरेंद्र मेंढे, गणेश लोहाडे, एम.सी. मेळे, सुशील पाऊलझगडे, एस.टी. भालेकर, रवींद्र खापर्डे, अनिल टेंभुर्णीकर, ए.एस. बिसेन, एन.जी. कांबळे, अंजन कावळे, वाय.आय. रहांगडाले, पी.सी. ठाकरे, ओमप्रकाश भुते, जे.आर. हरिणखेडे , महेंद्र कुथे, सुरेश कटरे, शोभेलाल ठाकूर, जैपाल ठाकूर, राम सोनटक्के, आर.पी.पटले, अनिल रामटेके, डी.बी. रहांगडाले, आनंद जांभुळकर, आर.आर. सदिने, मनोज पंधरे,अश्विन भालाधरे, मनोज खुरपुडे, संजय धुर्वे, दिलीप कुरुटकर उपस्थित होते.
अपशब्द बोलणाऱ्या जाधव यांच्यावर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 12:31 AM
शिक्षकांना देशद्रोही म्हटल्याबद्दल नामदेव जाधव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन सोमवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आमगाव शाखेच्या वतीने आमगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या नावे सहायक निरीक्षक एस.जी.घोरपडे यांना देण्यात आले.
ठळक मुद्देठाणेदारांना निवेदन : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची मागणी