गोंदिया : तालुक्यातील ग्राम आसोली येथील सेवा सहकारी संस्था संचालक धान खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात असा आरोप करणारे पुरनलाल उके यांचा आरोप खोटा असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी संचालकांनी केली आहे. यासाठी संचालकांनी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
उके यांनी संस्था फक्त संचालक मंडळाचा बारदाना दिला जात असून शेतकऱ्यांना बारदाना देत नाही. तसेच संचालक धान खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात असा आरोप केला होता. मात्र संस्थेत शेतकऱ्यांनी आणलेले धान शासकीय बारदानात टाकून मोजले जाते. शिवाय संस्थेतील संचालकसुद्धा शेतकरी असल्याने त्यांनाही धान विकण्याचा अधिकार आहे. अशात उके यांनी केलेले आरोप खोटे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संस्था अध्यक्ष शेरबहादूर कटरे, उपाध्यक्ष माणिकलाल लांजेवार, संचालक टेकचंद रहिले, पुरनलाल भेलावे, कैलाश भेलावे, जीवनलाल कावळे, सखाराम फुंडे, परसराम हुमे, महेश मेश्राम, फिरोज बंसोड, रतीराम मोहनकर, इंदिरा गायधने, हिरकन भेलावेव सदस्यांनी केली आहे.