शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

दुष्काळासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 12:56 AM

हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने ....

ठळक मुद्देराष्टÑवादी कॉँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाºयांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याच्या अंदाजावरून शेतकºयांनी जून महिन्याच्या सुरूवातीलाच धानाचे पºहे टाकले. मात्र, रोवणीनंतर दमदार पाऊस झाला नसल्याने संपूर्ण जिल्ह्यात सुमारे १ लाख हेक्टर वरील रोवण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे आता पाऊस झालाही तरी शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून दुष्काळी परिस्थिती बघता शेतकºयांना मदत करण्याच्या दृष्टीने तातडीने निर्णय घेण्यात यावा. अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने केली आहे. यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात, ३१ जुलैच्या स्तरावर जिल्ह्यात सरासरी ६७४.८७ मिमी. पावसाची आवश्यकता असते. परंतु फक्त ४४२.०१ मिमी. पाऊस झाला असून तो सरासरीच्या ४० टक्के असल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी व शेत मजुर अडचणीत असून त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देणे, संपूर्ण जिल्ह्यात धानाची नर्सरी न लावलेल्या शेतीचे कृषी व महसूल विभागाच्यावतीने संयुक्त सर्वेक्षण करण्यात यावे, धानाची नर्सरी ज्या शेतकºयांनी पाण्याच्या अभावी लावली नाही त्या शेतकºयांना तातडीने मदत करणे, जिल्ह्यात सरासरीच्या ४० टक्के पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.त्या संबंधी उपाययोजना करणे, ज्या शेतकºयांनी या हंगामामध्ये शेतीसाठी बियाणे व खतांवर लाखो रुपये खर्च केले त्याची भरपाई शासनाकडून करणे, अशा शेतकºयांची यादी तयार करुन ज्यांनी पीक विमा काढला नाही त्यांना तातडीने विशेष बाब म्हणून शासनाच्यावतीने पीक विमा योजना काढणे, नर्सरी लावली परंतु पाऊस नसल्याने ती मरत आहे त्या शेतकºयांचे सर्वेक्षण करुन मदत करने व विशेष बाब म्हणून पीक विमा करणे, मागेल त्याला काम या दृष्टीने महाराष्टÑ ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाचे नियोजन करुन जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजुरांना मोठ्या प्रमाणावर त्यांचेच गावात कामे उपलब्ध करुन देणे, पुढील हंगामासाठी शेतकºयांना मोफत बियाणे व खते उपलब्ध करुन देणे, ज्या शेतकºयांकडे बॅकांची अल्प मुदती व मध्य मुदती चालू व थकीत कर्ज आहे ते माफ करणे, शेतकºयांकडील जनावरांसाठी छावण्या सुरु करुन मोफत चारा उपलब्ध करुन देणे, हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून हवामान खात्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणे, पडीत जमिनीमध्ये ज्वारी सारखी कमी पावसाची पिके घेत येत असतील तर त्या दृष्टीने शेतकºयांना मदत करण्यात यावी अशी मागणी केली. अशात दुष्काळी परिस्थिती बघता शासनस्तरावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी काळे यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देताना शिष्टमंडळात प्रामुख्याने माजी आमदार दिलीप बन्सोड, माजी जि.प. अध्यक्ष विजय शिवणकर, जिलाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रीकापुरे, अशोक सहारे, शिव शर्मा, टिकाराम मेंढे, राजू एन. जैन, डुमेश चौरागडे, केतन तुरकर, जितेश टेंभरे, तिर्थराज हरिणखेडे, रमेश गौतम, कैलास पटले, सुखराम फुंडे, नानू मुदलीयार, जगदीश बहेकार, रफीक खान, गणेश बरडे, देवेंद्रसिंह मच्छिरके,लता रहांगडाले, जिम्मी गुप्ता, प्रमोद शिवणकर,गुड्डू बिसेन, मदन चिखलोंढे, राजेश तुरकर, रामु चुटे, विनायक शर्मा, रौनक ठाकुर, नितेश बहेकार, मनिष अग्रहरी, एकनाथ वहिले, संजीव राय, रमन उके, चंद्रकुमार चुटे, नरेंद्र ठाकुर, ज्ञानेश्वर पगरवार, करन टेकाम, सुरेश कावळे, महेंद्र बघेले, खेमराज शरणागत, सोबत इतर कार्यकर्ते उपस्थित होते.