गोरेगाव : महाराजस्व अभियानांतर्गत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी एकाच वेळी सर्व लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा म्हणून महासमाधान शिबिराचे आयोजन केले आहे. शासनाच्या ५० योजनांचा लाभ महासमाधान शिबिरात मिळणार आहे. तालुक्यातील सर्व जनतेने महासमाधान शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत यांनी केले आहे. स्थानिक पंचायत समिती सभागृहात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक डॉ. भगत यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली.यावेळी पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, जि.प. सदस्य विश्वजीत डोंगरे, भाजपा तालुका महामंत्री संजय बारेवार, व्यंकट कटरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, तालुकाध्यक्ष अनंता ठाकरे, पं.स.सदस्य पुष्पराज जनबंधू, युवा मोर्चा तालुका महामंत्री फनेंद्र पटले, गणेश येरणे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जि.प. सदस्य डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना शिबिरात आपली महत्वपूर्ण भूमिका पार पाडून प्रत्येक लाभार्थ्याला योजनांचा लाभ देण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांसोबत महासमाधान सेवक म्हणून काम क रून महत्वाचे भूमिका पार पाडायची असल्याचे सांगीतले. बैठकीत अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. (शहर प्रतिनिधी)
महासमाधान शिबिराचा लाभ घ्यावा
By admin | Published: July 31, 2016 12:30 AM