गोंदिया : राष्ट्रीय माता बालसंगोपन कार्यक्रम अंतर्गत गोंदिया जिल्हा आरोग्य प्रशासनातर्फे बुधवारी बाई गंगाबाई महिला रुग्णालयात मोफत न्यूमोकोकल (पीवीसी) लसीकरणाचा जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे, लसीकरणाचे उद्घाटक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, प्रमुख अतिथी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक बाल रोग विभाग प्रमुख डॉ. मनिष तिवारी, प्रा. सुनील देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर सोनारे, पीएचएन रुपाली टोणे, निलू चुटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मेट्रन अधिकारी माधुरी लाड यांनी केले. न्यूमोनिया प्रतिबंधक पीवीसी लसीकरण शास्त्रीय माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे यांनी उपस्थित पालकांना दिली. ओपीडी इंचार्ज देशमुख अहीर, परवेज शेख, बालरोग विभाग पारधी, स्वाती बन्सोड, दीपाली पानतावणे, जिजा अहीर, शेरकुरे, पल्लवी वासनिक यांनी सहकार्य केले. न्यूमोकोकल लसीकरण ११ बालकांना करण्यात आले. जिल्ह्यात सर्व ग्रामीण रुग्णालयात ही लस उपलब्ध आहे.