शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 6:00 AM

खा.अशोक नेते यांनी कचारगड यात्रे दरम्यान भाविकांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच जिल्हा प्रशासनाने यासाठी नेमकी काय तयारी केली आहे.याचा आढावा घेतला.यात्रेदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रास्थळी काम सुरू केले आहे.

ठळक मुद्देअशोक नेते यांचे निर्देश : सालेकसा येथे घेतली आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : समस्त आदिवासी बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या तालुक्यातील कचारगड येथील यात्रेला ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. या यात्रेकरिता देशभरातील लाखो भाविक येथे दरवर्षी येतात.यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी स्थानिक प्रशासनाने घेऊन सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्या असे निर्देश खा.अशोक नेते यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.कचारगड यात्रेच्या पार्श्वभूमीवर सालेकसा येथील तहसील कार्यालयात गुरूवारी आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. खा.अशोक नेते यांनी कचारगड यात्रे दरम्यान भाविकांना कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.तसेच जिल्हा प्रशासनाने यासाठी नेमकी काय तयारी केली आहे.याचा आढावा घेतला.यात्रेदरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्याचे निर्देश दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाने यात्रास्थळी काम सुरू केले आहे. पाणी पुरवठा, ग्रामीण रुग्णालयातर्फे रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच ३० रुग्णवाहिका आकस्मिक सेवेसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. स्थानिक पंचायत समिती, वन विभाग आणि तहसील कार्यालयातर्फे सुध्दा विविध उपाय योजना करण्यात येत असल्याचे सांगितले.या वेळी यात्रेला केंद्रीय मंत्री फगणसिंह कुलस्ती हे येणार असून त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुध्दा आवश्यक उपाय योजना करण्याचे निर्देश खा.नेते यांनी दिले.बैठकीला दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवासालेकसा येथील तहसील कार्यालयात गुरूवारी कचारगड यात्रेच्या पूर्व तयारी संदर्भात खा.नेते यांनी आढावा बैठक बोलविली होती. मात्र या बैठकीला विविध विभागाच्या २९ अधिकाऱ्यांनी दांडी मारली.त्यामुळे खा.नेते यावर चांगले संतापले. गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाºयांना दिले. नोटीसचे उत्तर आल्यानंतर सात दिवसात कारवाई करुन अहवाल सादर करण्यास सांगितले.

 

टॅग्स :Kacharagarh templeकचारगड देवस्थानAshok Neteअशोक नेते