गोंदिया : राज्य शासनाने सन २००४ मध्ये लोधी समाजाला ओबीसींच्या सूचीत समाविष्ट केले. परंतु केंद्राच्या ओबीसींच्या सूचीत समाविष्ट होण्यासाठी त्यांचा लढा सुरू आहे. त्यासाठी राजीव ठकरेले यांना मागील वर्षी लोधी समाजाचे राज्य प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले. तर ठकरेले यांच्या नेतृत्वात ५ डिसेंबर रोजी दिल्लीतील जंतर मंतर मैदानात देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यात देशभरातील लोधी समाज एकत्र येवून आपल्या संवैधानिक अधिकारासाठी आंदोलन करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या चमूसह मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, आमदार, समाजातील खासदारांना निवेदन देवून सदर मुद्दा मांडला. तसेच निवेदन खासदार नाना पटोले यांनाही देण्यात आले. पटोले यांनी तसे आश्वासन देवून मागील दोन वर्षांपासून आपल्याच सरकारला पत्र लिहून मागणी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली. मात्र आपल्या मागणीला यश मिळत नसल्याचे पाहून त्यांनी लोधी समाजाला ओबीसींच्या केंद्राच्या सूचीत समावेश करण्याचा मुद्दा संसदेत मांडला व तसे प्रधानमंत्र्यांना पत्रसुद्धा लिहिले. (शहर प्रतिनिधी)
लोधी समाजाला ओबीसीत घ्या
By admin | Published: August 14, 2016 2:06 AM