शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 9:58 PM

अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात.

ठळक मुद्देक्षीरसागर यांची मागणी : २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे कृषी व वनमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : अलीकडच्या काळात वानरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून मानवी वस्तीतही त्यांचा हैदोस वाढला आहे. शेतकरी आधुनिक व परंपरागत पद्धतीने शेती करतो. परंतु वानरांचे कळपाने येवून शेत पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे त्यांची संख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी नसबंदी हा उत्तम उपाय असल्याचे चिखली निवासी अशोकुमार क्षीरसागर यांनी म्हटले आहे. यासाठी परिसरात जनजागृती करुन २५ सरपंचांच्या स्वाक्षरीचे निवेदन राज्याचे कृषी व वनमंत्री यांना पाठविले आहे.वानरांपासून घरांचे कवेलू भाजीपाला, फळे, जवस, लाखोळी, तूर इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून ते थांबणे गरजेचे आहे. ही बाब समजून घेत चिखलीचे सरपंच कैलाश पटले, भिवापूरचे सिद्धार्थ रंगारी, इंदोराच्या हेमलता खोब्रागडे, निमगावचे मनोहर फरकुडे, खमारीचे रमेश रहांगडाले, डोंगरगावचे दिलीपकुमार बिसेन, सुकडी-डाकरामच्या चेतना बावनथडे, ठाणेगावचे तिर्थराज बागडे, गराडाच्या ललीता टिलगामे, मलपुरीचे लच्छु बिसेन, बिरसी फाटाच्या पद्मा वैद्य, लाखेगावचे नरेश जुनेवार, विहीरगावच्या अनुसया इळपाते, बोपेसरचे छत्रपती नागपूरे, सरांडीच्या शोभा कांबडी, पांजराचे राजेंद्र चामट, मुंडीकोटाच्या निर्मला भांडारकर, नवेगाव खुर्दच्या मंदा कुंभरे, घोगराचे रुपेश भोंडेकर, घाटकुरोडाच्या निर्मला डोंगरवार, चांदोरीचे जयसिंग उपासे, बिरोलीच्या जयश्री बाभरे, सालेबर्डीचे विनोद लिल्हारे, मांडवीचे दुर्गाप्रसाद दमाहे, मुंडीपारच्या शिला साठवणे, मेंदीपूरच्या मुक्ता रहांगडाले या सर्व सरपंचांनी क्षीरसागर यांच्या योजनेला पाठींबा दर्शवून स्वाक्षरी दिली.ही जनजागरण मोहीम मागील ७ वर्षापासून सुरु केली असून याबाबत आमदार विजय रहांगडाले यांनाही माहिती दिली. मंत्रालयातून या मोहिमेला प्राधान्य देत शासनाकडून याची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे. अशी नसबंदी अन्य राज्यात करण्यात येत असून बंदराच्या संख्येवर आळा घालण्यात येत आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा याची अंमलबजावणी करुन यामुळे होणारे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी क्षीरसागर यांनी कृषी व वनमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Monkeyमाकड