आॅनलाईन लोकमततिरोडा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यकाळ ५ वर्षाचा करण्यात यावा यासह मागण्यांसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान निवेदन दिले. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्हा महात्मा गांधी तंटामुक्त संघटनेच्यावतीने आमदार रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले होते व याप्रकरणी आमदार रहांगडाले यांनी मध्यस्थी करीत ग्राम विकास मंत्र्यांपुढे त्यांच्या मागण्या मांडल्या.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचा कार्यकाळ पाच वर्षाचा करण्यात यावा, तंटामुक्त पुरस्कार निधी खर्च करण्याचा अधिकार समितीला देण्यात यावा, तंटामुक्त अध्यक्षाला सरपंचप्रमाणे अधिकार देण्यात यावे, तंटामुक्त समितीला वर्षातुन एकदा आमसभा ठेवण्याचे अधिकार देण्यात यावे, गावातील तंट्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र इमारत ग्रामपंचायतने उपलब्ध करुन द्यावी, तंटामुक्त अध्यक्ष व समिती सदस्यांना मानधन देण्यात यावे, अध्यक्षाला विशेष कार्यकारी दंडाधिकारीचे अधिकार देण्यात यावे आदि मागण्यांसाठी जिल्हा तंटामुक्त संघटना मागील चार वर्षा पासून लढत आहे.दरम्यान समितीच्यावतीने आमदार रहांगडाले यांना निवेदन देण्यात आले होते. याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात त्यांच्या मागण्या ग्राम विकास मंत्री मुंडे यांच्या पुढे मांडण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आमदार रहांगडाले यांनी ग्रामविकास मंत्री मुंडे यांना तंटामुक्त संघटनेच्या मांगण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन दिले. यावर पकंजा मुंडे यांनी मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेश तायवाडे, उपाध्यक्ष सुरेश भगत, मुमताज अल्ली सय्यद, सचिव श्रावण बरियेकर, कोषाध्यक्ष विनोद बरेकर, कार्याध्यक्ष हमजभाई शेख, चुनीलाल बिसेन, श्रावण रहांगडाले यांनी आमदार रहांगडाले यांचे आभार मानले.
तंटामुक्त समित्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:48 PM
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची कार्यकाळ ५ वर्षाचा करण्यात यावा यासह मागण्यांसाठी आमदार विजय रहांगडाले यांनी ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांना नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान निवेदन दिले.
ठळक मुद्देपंकजा मुंडे यांना निवेदन : आमदार रहांगडाले यांची मध्यस्थी