शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

दारूबंदीसाठी तंमुसचा एल्गार

By admin | Published: October 06, 2015 2:24 AM

महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर गावात शांतता व सुव्यवस्था रहावी, दारूच्या व्यसनामुळे अनेकांची उद्वस्त होणारी

 सागर काटेखाये ल्ल साखरीटोलामहात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पर्वावर गावात शांतता व सुव्यवस्था रहावी, दारूच्या व्यसनामुळे अनेकांची उद्वस्त होणारी कुटुंबे व त्यातून निर्माण होणारी समस्या दूर व्हावी या उदात्त हेतूने गांधीटोला तसेच मक्काटोला येथील तंटामुक्त समितीने विशेष अभियान म्हणून गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्धार केला. गावकऱ्यांनीही दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.सालेकसा तालुक्यातील गांधीटोला ग्रामपंचायत व मक्काटोला ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी तंटामुक्त समितीने २ आॅक्टोबर रोजी सभा घेवून गावात दारूबंदी करण्यासाठी ठराव पारित केला. त्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून तळीरामांचीसुद्धा चांगलीच पंचाईत झाली आहे. गांधीटोला ग्रामपंचायत अंतर्गत भजियादंड, सालईटोला, चर्जेटोला या गावांचा समावेश आहे. तर मक्काटोला ग्रामपंचायत अंतर्गत दुर्गुटोला गावाचा समावेश आहे.भजियादंड, दुर्गुटोला व गांधीटोला येथे काही लोक अवैधरित्या दारूची विक्री करतात. त्यामुळे अनेक लोक दारूच्या आहारी गेले आहेत. याचा परिणाम गावाच्या शांततेवर होत होते. तसेच दारूच्या व्यसनामुळे काहींचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर होते. ही बाब लक्षात घेवून गांधीटोला येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेंद्रसिंग बैस यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेवून गांधी जयंतीच्या पर्वावर सभा घेवून गावात दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. गांधीटोला येथे दारूबंदीविषयी जनजागृती करण्यात आली. मक्काटोला येथेसुद्धा तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामप्रकाश दोनोडे यांच्या अध्यक्षतेखाली मोहीम हाती घेण्यात आली असून अवैध दारूविक्रेत्यांवर आळा बसला आहे. या मोहिमेत पंचायत समितीचे माजी सभापती तुकाराम बोहरे, प्रेमलाल फुंडे, रूपचंद खांडवाये, राजेश शहारे, रमेश अग्रवाल, खेमराज गायधने, मुकेश शेंडे, प्रेमलाल मुनेश्वर, जैतराम कुतीर, पारथ बैस, उत्तम चर्जे, देवराम मेंढे, राहुल कोरे, सेवक अंबादे, नागोराव बहेकार, मनोज शहारे, नाना टेंभुर्णीकर, रवी बडोले, करूणा शहारे, पुष्पा बघेले, क्रिकेट चमूचे सर्व युवक व गावकरी यांचा समावेश आहे.दारूबंदीसाठी जनजागृती रॅली४रविवारी ४ आॅक्टोबरला गांधीटोला ते मक्काटोलापर्यंत रॅली काढून दारूबंदीविषयी जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे आंबट शौकिनांना दारू पिण्यापासून परावृत्त करून दारूबंदी मोहिमेत समाविष्ट करून घेण्यात आले. त्यामुळे गावात दारूबंदीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.