लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या हद्दीत येणारे तलाव व जलाशय वर्षानुवर्षे उपेक्षित असून त्यातील लाख मोलाचे पाणी वर्षभर निरूपयोगी पडून असते. एवढेच नाही तर गाळ आणि वनस्पतीचा भरणा वाढल्याने एकीकडे पाणी उपयोगासाठी उपयुक्त राहत नाही. तर तलावात पाण्याची साठवण क्षमता सुद्धा कमी होत चालली आहे, अशात हे तलाव नाव व पाण्यापुरतेच उरले आहेत.गोंदिया-भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातोे त्यातल्या त्यात गोंदिया जिल्ह्यामध्ये तलावांची संख्या खूपच जास्त आहे. शतकानुशकते या जिल्ह्यातील लोकांचे जीवन व त्याच्या पशुपालनाचे आधार गावशेजारी असलेले छोटे किंवा मोठे तलावच राहीले आहे. कालांतराने मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्ग या जिल्ह्याच्या मधातून गेला आणि अनेक तलाव रेल्वे मार्गात लुप्त झाले तर अनेक तलाव रेल्वेने अधिगृहित केलेल्या जमिनीच्या हद्दीत गेले आहेत. रेल्वे कायद्यानुसार रेल्वेच्या हद्दीतील कोणतीही वस्तू सामान्य व्यक्ती आपल्या वापरात घेऊ शकत नाही.इंग्रज काळात बनविण्यात आलेले कठोर कायदे स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आजही अंमलात आणले जात आहेत. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील तलावांचा उपयोग त्या परिसरातील सामान्य नागरिक किंवा कोणीही करु शकत नाही. जिल्ह्याच्या पूर्वेकडील चांदसूरजपासून (दरेकसा) तर पश्चिमेकडील मुंडीकोटापर्यंत १०० किलोमीटरच्या अंतरावर अनेक तलाव रेल्वेच्या हद्दीत अस्तित्वात आहे किंवा अस्तीत्व समाप्त होण्याच्या मार्गावर आहेत.यात सालेकसा, आमगाव, गोंदिया, तिरोडा तालुक्यातील वेगवेगळ्या स्वरुपाच्या तलावांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त गोंदिया ते बालाघाट आणि गोंदिया ते वडसा मार्गावर सुद्धा काही तलाव रेल्वेच्या हद्दीत पडून आहेत.वर्षानुवर्षे रेल्वेच्या हद्दीतील तलाव नादुरुस्त पडून राहिल्याने तलावांमध्ये गाळ साचून पाणी साठवण क्षमता फारच कमी झाली आहे. तलावाच्या चारही बाजूंनी अनावश्यक वनस्पती आणि अतिक्रमणामुळे तलावांचे स्वरुप विद्रूप झालेले आहेत. एवढेच नाही तर या तलावांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात आले आहे. सतत एकाच ठिकाणी पाणी साचून राहिल्याने त्यांचा उपयोग अनेक महत्वाच्या कामांसाठी करता येत नाही. अशात या तलावांचा काय उपयोग असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच रेल्वेच्या कायद्यामुळे या तलावांचा कोणत्याही कामासाठी उपयोग करता येत नाही.मत्स्यपालनासाठी तलावांची मागणीरेल्वेच्या हद्दीतील तलाव मत्स्यपालन व सिंगाडा उत्पादनासाठी देण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील मासेमार अनेक वर्षापासून करीत राहीले. या संदर्भात त्यांनी मागील वर्षी गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांची भेट घेतली होती. तेव्हा नेते यांनी, त्यांची मागणी लक्षात घेता प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु रेल्वेच्या कायद्यात सर्व काही अडकून पडले आहे.
रेल्वेच्या कायद्यात अडकले तलावांचे सौदर्यीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 9:32 PM
मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील रेल्वेच्या हद्दीत येणारे तलाव व जलाशय वर्षानुवर्षे उपेक्षित असून त्यातील लाख मोलाचे पाणी वर्षभर निरूपयोगी पडून असते. एवढेच नाही तर गाळ आणि वनस्पतीचा भरणा वाढल्याने एकीकडे पाणी उपयोगासाठी उपयुक्त राहत नाही.
ठळक मुद्देलाख मोलाचे पाणी निरूपयोगी : मत्सपालनासाठी परवानगी नाही