लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.शहरात बघितल्यास ७०० हून जास्त सार्वजनिक हँडपंप आहेत. यात खासगी हँडपंपांची संख्या हजारोंच्या घरात आहे. मात्र ७०० मधील बहुतांश हँडपंप नादुरूस्त आहेत. नगर परिषद अभियंता उमेश शेंडे यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे २५-३० हँडपंप नादुरूस्त आहेत. एवढ्यावरही या हँडपंप दुरूस्तीसाठी पाहिजे त्या प्रमाणात प्रयत्न केले जात नसल्याचे दिसते. या हँडपंप दुरूस्तीसाठी कर्मचारी उपलब्ध होत नसल्याचे दिसते. अशात ज्या ठिकाणी गरज आहे तेथे टॅँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.शहरात नगर परिषदेचे ६० पंप हाऊस आहेत. या पंप हाऊसच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पूर्तता केली जाते. मात्र या पंप हाऊसमधील पाणी पिण्यासाठी नव्हे तर कपडे धुण्यासाठी केला जात असल्याचे बोलले जाते. त्यातही शहरातील काही भागांत पंप हाऊसने पाणी पुरवठा होत नाही. कारण, नादुरूस्त किंवा तुटफुट झालेले आहेत.सायंकाळी पाणी पुरवठा नाहीवैनगंग नदीतील पाणी संपल्यामुळे डांगोरली घाटातून पर्याप्त पाणी गोंदिया शहरापर्यंत नाही येत आहे. शहरात सुमारे १५ हजार नळ कनेक्शन आहेत. अशात पाण्याची टंचाई बघता शहराल फक्त सकाळीच पाणी दिले जात आहे. आता ९० किमी अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून डांगोरलीपर्यंत पाणी आणले आहे. मात्र सायंकाळी पाणी सोडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी, याबाबत काही सांगता येत नसल्याचे सांगीतले. तर मजिप्राचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे यांनी, अगोदर वैनगंगा नदीतील बंधारा भरण्याची वाट बघितली जाणार. त्यानंतर नदीत आणलेल्या पाण्याची पातळी स्थायी राहणार असल्याचे बघूनच त्यानंतर याबाबत निर्णय घेता येणार असल्याचे सांगीतले.
शहरात टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 9:20 PM
राज्यातील अन्यत्र जेथे पाणी टंचाई भेडसावते तेव्हा गोंदिया जिल्ह्यात पाणी असते. हीच बाब हेरून, जिल्हा प्रशासनाकडून गोंदिया जिल्हा ट्रॅकरमुक्त असल्याचे सांगितले जाते. वास्तविक मात्र, आजघडीला गोंदिया शहरातच पाणी पेटले असून शहरातील काही भागांमध्ये टॅँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.
ठळक मुद्दे३० पेक्षा अधिक हॅँडपंप नादुरूस्त : दुरूस्तीसाठी कर्मचाऱ्यांचा अभाव