सीबीएसई दहावीचा निकाल : सौम्या व अंजली द्वितीयलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता दहावी सिबीएसई चा निकाल शनिवारी (दि.३) जाहीर करण्यात आला. यामध्ये येथील साकेत पब्लिक स्कूलच्या तनूश्री संजय गौतम या विद्यार्थिनीने ९८.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बारावीच्या निकाला नंतर आता निकालांचे सत्र सुरू झाले आहे. त्यात शनिवारी (दि.३) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सिबीएसई) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात येथील साकेत पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी तनूश्री संजय गौतम हिने ९८.६ टक्के गुण घेऊन जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. तर याच शाळेतील अंजली रामरतन रेला व सौम्या अजय अग्रवाल यांनी ९७.८ टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविल्याबद्दल तनूश्रीचा शाळा संचालक चेतन बजाज यांच्या हस्ते पालकांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील साकेत पब्लिक स्कूल, गोंदिया पब्लिक स्कूल, प्रोग्रेसिव्ह स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल आदि शाळांचाही शंभर टक्के निकाल लागला आहे. विशेष म्हणजे बारावीच्या निकाला नंतर आता दहावीच्या निकालातही मुलीच जिल्ह्यात आघाडीवर दिसून येत आहेत. यातून मुलींचीच इनिंग सुरू असल्याचेही दिसून येत आहे.
साकेतची तनुश्री गौतम जिल्ह्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2017 12:50 AM