लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरीप हंगाम सुरू होण्यास केवळ काहीच दिवस शिल्लक असताना अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकरीपीक कर्ज मिळण्यापासून वंचित असल्याचे चित्र आहे. शासनाने जिल्हा, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांना खरीप हंगामात २७० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र आत्तापर्यंत केवळ ८३ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. कर्ज वाटपाची टक्केवारीवर नजर टाकल्यास केवळ ३०.७१ टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. त्यामुळे यंदा तरी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणार की नाही याबाबत शंका आहे.शेतकरी खरीप हंगामात आर्थिक चणचण भासू नये, त्यांच्यावर सावकार किंवा व्यापाऱ्यांच्या दारात जावून व्याजाने पैसे घेण्याची वेळ येऊ नये यासाठी खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात पीक कर्जाचे वाटप केले जाते. नाबार्ड आणि शासनाकडून दरवर्षी बँकांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते.यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.खरीप हंगाम अगदी तोंडावर असताना बँकांकडून केवळ ३० टक्के पीक कर्ज वाटप झाले असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी अजूनही पीक कर्ज मिळण्यापासून वंचित आहे. जिल्हा बँक वगळता राष्ट्रीयकृत बँकांना अद्यापही शेतकºयांचा विश्वास संपादन करण्यात यश आलेले नाही. राष्ट्रीयकृत बँकातून पीक कर्जाची उचल करण्याची प्रक्रिया फारच किचकट आहे.वांरवार चकरा मारुन सुध्दा पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी या बँकामध्ये जाणे टाळतात. तर जिल्हा बँकेची प्रक्रिया त्या तुलनेत बरीच सुलभ आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना ही बँक आपली वाटत असल्याने शेतकरी सुध्दा याच बँकेतून अधिक पीक कर्जाची सर्वाधिक उचल करतात. त्यामुळेच आतापर्यंत जिल्हा बँकेने सर्वाधिक ६६ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप केले आहे.कोरोनामुळे पीक कर्ज मेळाव्यांवर संकटमागील दोन वर्षांपासून शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यासाठी तालुका स्तरावर कर्ज वाटप मेळाव्याचे आयोजन केले जात होते. मात्र यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करणे कठीण आहे.अशा स्थितीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
टार्गेट २७० कोटीचे वाटप ८३ कोटीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 5:00 AM
यंदा खरीप हंगामासाठी २७० कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. यापैकी आतापर्यंत गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १५ हजार २८४ शेतकºयांना ६६ कोटी ३७ लाख रुपयांचे, राष्ट्रीयकृत बँकानी ८५५ शेतकºयांना ५ कोटी ९७ लाख रुपयांचे तर ग्रामीण बँकांनी १० कोटी ५७ लाख अशा एकूण ८२ कोटी ९१ लाख ५२ हजार रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. यासर्व बँकांनी आतापर्यंत ३०.७१ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे.
ठळक मुद्देजिल्हा बँक आघाडीवर : राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरच