गोंदिया : बचत गटातील कर्जदार महिलांकडून एजंट जबरन वसुली करीत आहेत. यातच त्यांनी महिलांना किश्त न दिल्यास २९ तारखेनंतर बघून घेण्याची धमकी दिली आहे. अशात कुणालाही प्राण हानी झाल्यास त्याला एजंट जबाबदार राहणार असे निवेदन तालुक्यातील ग्राम रतनारावासीयांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांना दिले आहे. ग्राम रतनारा येथील बचतगटातील महिलांकडून एजंट गावात जावून जूरन वसुली करीत आहेत. तसेच धमकी देऊन महिलांच्या स्वाक्षरी घेत आहे. याशिवाय २८ तारखेचे महिला संमेलन रद्द करविले असून २८ तारखेला चार महिन्यांची किश्त द्यायची असे बोलत आहेत. तसेच किश्त न दिल्यास २९ तारखेला सर्व महिलांना बघून घेण्याची धमकी देऊन त्यांच्या घरी जावून दबाव टाकत आहेत. अशात प्राणहानी झाल्यास एजंट जबाबदार राहणार असे निवेदन पालकमंत्र्यांना रूखमी कोठेवार, भुमेश्वरी कोठेवार, रेणुका कोठेवार, जागृती लिल्हारे, जसवंता नागपूरे, सिशुला बहेटवार, हेमलता नागपुरे आदिंनी दिले आहे.
एजंटांकडून जबरीने कर वसुली
By admin | Published: April 02, 2017 1:19 AM