शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
5
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
6
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
7
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
10
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
11
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
12
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
13
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
14
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
15
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
16
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
17
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
18
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
19
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
20
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?

निवडणुकीचे मानधन देण्याची शिक्षक समितीची मागणी

By admin | Published: August 03, 2015 1:27 AM

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणारे मतदान केंद्राध्यक्ष

गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काम करणारे मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकारी यांचे मानधन त्वरित देण्यासंबधी सडक-अर्जुनीचे नायब तहसीलदार पी.आर. अटराये यांना निवेदन देण्यात आले. या अगोदर आॅगस्ट व सप्टेंबर २०१० मध्ये सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले ते कर्मचारी पाच वर्षाचा कालावधी संपूनसुध्दा मानधनापासून वंचित आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन जवळच्या तालुक्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले. मग सडक-अर्जुनी तालुक्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मानधन का देण्यात आले नाही, असा प्रश्न शिक्षकांत निर्माण होऊन निवडणूक यंत्रणेविषयी असंतोष निर्माण होत आहे.या मागणीला घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सडक-अर्जुनीच्या वतीने किशोर डोंगरवार, तालुका सरचिटणीस डी.आर. जिभकाटे, तालुकाध्यक्ष डी.एन.बडोले, बालू वालोदे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. मानधन देण्यात आले नाही तर शिक्षक समितीच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. नायब तहसीलदार पी.आर. अटराये यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून समस्या सोडविण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)