अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: आयुष्य हे शिक्षणातून घडते. श्रीमंतीचे शास्त्र म्हणजे शिक्षण. शिक्षण म्हणजे उज्ज्वल भवितव्य, उज्ज्वल भविव्य म्हणजे समृद्धजीवन. आदर्श जीवन जगण्याची प्रेरणा श्क्षिणातूनच मिळते. यशस्वी जीवन जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे मत आहे.‘भावाच्याच प्रेरणेतून घराबाहेर पडलो अन् झालोे अधिकारीमाझे मोठे बंधू लक्ष्मण चंद्रिकापुरे यांनी बाहेर शिक्षणासाठी घेऊन गेले नसते. मी गाव सोडलं नसतं तर माझं जीवन प्रखर झाले नसतें. हाच माझ्या जीवनातील कलाटणी देणारा क्षण आहे. आई वडील शेतात राबणारे. त्यामुळे कृषी विषयाची आवड होती. प्राथमिक शिक्षण सडक अर्जुनी तालुक्याच्या बाम्हणी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले.आदर्श विद्यालय आमगाव येथे माध्यमिक शिक्षण घेतले. उच्च शिक्षणासाठी शहरात गेलो.नागरी मुलकी सेवेची आवड होती.अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झालो.शिक्षणासाठी घराबाहेर पडा...भारतीय संस्कृतीत गुरूला देवतुल्य दर्जा दिला आहे.नवजात जन्मलेल्या बाळाची प्रथम गुरू माता असते. शालेय जीवनात कला,विज्ञान,संस्कार, व्यावहारिकता असे सर्वसमावेशक ज्ञानाचे धडे शिक्षक देतात.त्यामुळेच गुरूला अनन्यसाधारण महत्व आहे. मानवाच्या जीवनात अनेक गुरू असतात.परंतु जीवनाला कलाटणी देणारे,आकार देणारे आई-वडील व शिक्षक असतात. शिक्षणासाठी बाहेर पडावे असा सल्ला आ.चंद्रिकापुरे यांनी दिला.
प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत व्हावाआपला भाग गरीब असला तरी त्यावर मात करून यश संपादन करण्याची क्षमता येथील युवावर्गात आहे.त्यांना आकार देण्याची गरज आहे. ही बाब हेरून आपल्या जिल्ह्यातील युवक स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हावेत यासाठी शिक्षकदिनापासून प्रशिक्षण प्रारंभ करण्याची तयारी होती पण कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे होऊ शकले नाही. निवडक विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षेचे वर्ग सुरू करणार आहोत. यात आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन मिळेल. हल्ली प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत करण्याची आवश्यकता आहे.
प्रत्येक वळणावर गुुरू आदरणीयआ.मनोहर चंद्रिकापुरे म्हणाले, की त्यांच्या शैक्षणिक वाटचालीत कोकोडे, कटरे, बी. ओ.वासनिक, चौतकंटीवार, येरणे, राहांगडाले, डॉ. ठाकरे, रेहपाडे, आर.आर.सिन्हा, डॉ.सुपे, डॉ.कुबडे या शिक्षकांचा सिंहाचा वाटा आहे. अलाहाबाद येथील त्रिपाठी सरांमुळे इतिहास या विषयाची विशेष प्रेरणा मिळाली.