लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियातर्फे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे व जिल्हाध्यक्ष मनोजकुमार दीक्षित यांनी दिला आहे.मागील अनेक वर्षापासून गोंदिया शिक्षण विभाग गोंदियाच्या उदासिन धोरणामुळे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबीत आहेत.शिक्षक समितीतर्फे अनेकदा निवेदन देण्यात आले. तसेच धरणे आंदोलन सुध्दा करण्यात आले. पण यानंतरही शिक्षकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात आला नाही. जिल्ह्यातील शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी वेतन अदा करणे, मागील वर्षी रँडममध्ये बदली झालेल्या शिक्षक बांधवांकरीता समानीकरणाच्या जागा रिक्त करणे, जीपीएफ, डीसीपीएस धारकांना पहिला हप्ता रोखीने अदा करणे, १५०० रुपये नक्षल भत्ता सर्वच तालुक्यातील शिक्षकांना देण्यात यावा.ाालेय पोषण आहाराची प्रलबिंत देयके देण्यात यावी. गणवेशाचा निधी सर्वच विद्यार्थ्यांना देण्यात यावा. शिक्षक व केंद्रप्रमुख यांचा मार्च २०१९ पर्यंतचा जीपीएफ व डीसीपीएसचा हिशोब देण्यात यावा, प्रलंबित वैद्यकीय प्रतीपूर्ती देयकासाठी मागणीनुसार निधी उपलब्ध करून देणे, संपकालीन तीन दिवसाचे वेतन अदा करणे, प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला वेतन अदा करणे, चटोपाध्याय व निवडश्रेणी प्रकरणे मंजूर करणे, सडक अर्जूनी येथील जीपीएफ अपहार रक्कम शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे, सेवापुस्तक अद्ययावत करण्यासंदर्भात तालुकानिहाय शिबिर घेण्यात यावे. शाळांना सादिल निधी अदा करणे, जीपीएफ कर्ज प्रकरणे मंजूर करणे, सेवानिवृत्तीची प्रकरणे तत्काळ मंजूर करणे, संगणक कपातीला स्थगिती देणे, उच्च परीक्षा परवानगीचे अधिकार गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात यावे. वर्गखोली बांधकाम व दुरूस्तीकरीता मागणीनुसार निधी उपलब्ध करून देणे, २ जानेवारीला नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ लागू करणे, विद्युत बिल जिल्हा परिषद फंडातून अदा करणे, शिष्यवृत्ती शुल्क जिल्हा परिषद फंडातून अदा करणे, अवघडची पुर्न:रचना करणे, सेवापुस्तक अद्ययावत करणे, शिक्षण समितीवर संघटनेचा प्रतिनिधी नेमणे या मागण्यांना घेवून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण २६ जूनपासून करण्यात येणार आहे. यात सर्व शिक्षकांची सहभागी व्हावे असे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षीत, जिल्हासरचिटणीस एल.यू.खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरवार,जिल्हा सहसचिव संदिप तिडके, सुरेश कश्यप,एन.बी.बिसेन,विनोद बडोले, प्रदीप रंगारी, पि.आर.पारधी, शेषराव येडेकर, कैलाश हांडगे, दिलीप लोदी, गजानन पाटणकर यांनी कळविले आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी शिक्षकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 9:44 PM
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गोंदियातर्फे शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शाळेच्या पहिल्याच दिवशी २६ जूनला जिल्हा परिषदेसमोर बेमुदत साखळी उपोषण करण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस एल.यू.खोब्रागडे व जिल्हाध्यक्ष मनोजकुमार दीक्षित यांनी दिला आहे.
ठळक मुद्देमागण्या मान्य करण्याची मागणी : शिक्षक समितीचा निर्धार