शहरं
Join us  
Trending Stories
1
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
2
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
3
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
4
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
6
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
7
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
8
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
9
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
10
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
11
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...
12
'वादळवाट', 'आभाळमाया' मालिकांचे गीतकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "...तर महाराष्ट्रात पडसाद उमटतील", बाबासाहेब देशमुखांनी ठाकरेंची चिंता वाढवली!
14
महागड्या प्लॅनचे टेन्शन संपले, Jio चा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'सांगोला'मध्ये ठाकरेंविरोधात पुन्हा 'सांगली पॅटर्न'?
16
Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडक्या बहिणी दिवाळी बोनसपासून मुकणार? निवडणूक आयोगाने योजना रोखली
17
IND vs NZ : भारताने ५४ धावांत ७ गडी गमावले; सुवर्णसंधी हुकली, विजयासाठी न्यूझीलंडसमोर खूप सोपे आव्हान
18
महाविकास आघाडीला झटका! अखिलेश यादवांनी चार उमेदवार केले जाहीर
19
झारखंडमध्ये निवडणूक आयोगाची मोठी कारवाई; पोलीस महासंचालकांना हटविले
20
माढ्यात तुतारीबाबतचा संभ्रम कायम; चार इच्छुक शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्यानंतर काय घडलं? 

विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची भटकंती सुरूच

By admin | Published: July 08, 2015 1:40 AM

तालुक्यात अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अजूनही पूर्ण व्हायची आहे. विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक वर्गांची ...

पालकांना धमक्या व प्रलोभने : परवानगीशिवाय दिल्या जातात टी.सी.डी.आर. गिरीपुंजे तिरोडातालुक्यात अनेक ठिकाणच्या शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया अजूनही पूर्ण व्हायची आहे. विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षक वर्गांची भटकंती सुरू असून आपल्या तुकड्या वाचविण्याच्या नादात पालकांना धमक्या व प्रलोभने दिल्या जात आहेत. काही ठिकाणी परस्पर टी.सी.च काढून नेली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत संगनमत करून, मुख्याध्यापकास विविध प्रलोभने देवून परस्पर टी.सी. नेण्याचा प्रकारही घडत असल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.टीसी (ट्रान्सफर सर्टीफिकेट) ही विद्यार्थी किंवा पालकांच्या हाती त्यांची स्वाक्षरी घेऊनच दिली जावी, असा नियम आहे. मात्र तालुक्यातील काही शाळेत असे न करता परस्पर दुसऱ्या शाळेतील शिक्षकांना, शाळांना विद्यार्थ्यांच्या टीसी दिल्या जातात. याबाबत पालकांना सुध्दा विश्वासात घेतल्या जात नाही. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळेच काही शाळेत हा भोंगळ कारभार सर्रास सुरू आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशा प्रकारचा तुच्छ प्रकार काही ठिकाणी सर्रास चालत आहे. कित्येक ठिकाणी पालकांच्या, विद्यार्थ्यांच्या स्वाक्षरी न घेताच परस्पर टी.सी.दिल्या जात आहेत. टी.सी. वितरण रजिस्टर, दाखल खारीज रजिस्टर, शिक्षणाधिकारी व वरिष्ठ अधिकारी यांनी स्वत: तपासावेत व स्वाक्षरी न घेता टी.सी. वितरित करणाऱ्या मुख्याध्यापकांवर कार्यवाही करावी, अशी पालकांची मागणी आहे.साम, दाम, दंड, भेदचा वापरकाही शाळेतील मुख्याध्यापक शाळा सुधार निधीच्या नावाखाली प्रती टी.सी. २०० ते ५०० रु. घेताना दिसून येतात. हे पैसे सुध्दा टी.सी. संबंधित पालक देत नसून दुसऱ्या शाळेतील शिक्षकच देतात. एक शिक्षक दुसऱ्या शिक्षकांस निधीच्या नावावर लुबाडायला लागल्याचे दिसून येत आहे. वास्तविक टी.सी.चे पैसे नियमानुसार घेता येत नाही. त्यात पर्याय शोधून शाळा सुधार निधीच्या नावावर लुबाडणूक चालली आहे. हेच पैसे पालक देणार असते तर इतके घेतलेच नसते व पालकांनी सुध्दा दिले नसते. विद्यार्थी आपल्याच शाळेत शिकावा त्यासाठी ड्रेस, पुस्तक, नोटबुक आणि प्रसंगी पैशाचेही आमिष दाखविल्या जात आहेत. एवढ्यावरच न थांबता दहावी, बारावीचे परीक्षा केंद्र असणारे काही मुख्याध्यापक व शिक्षक पालकांना, विद्यार्थ्यांना आमच्या शाळेत न पाठविल्यास परीक्षेत तुमच्या पाल्यांना रस्ट्रीकेट करू अशाही धमक्या देताना आढळून आलेत. साम, दाम, दंड, भेद या तंत्राचा वापर होताना दिसून येतो.