लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सकारात्मक चर्चेतून निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.जिल्हा कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले यांची नुकतीच भेट घेवून निवेदन दिले. तसेच मागासवर्गीय शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा केली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बिंदू नामावली निश्चित करुन प्रकाशित करावी. केंद्र प्रमुख, उच्चश्रेणी मुख्याध्यापक पदोन्नतीने व इयत्ता ६ वी ते ८ ला विषय शिक्षकांची पदस्थापनेने भरण्यात यावी. शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षण विस्तार अधिकारी यांची पदस्थापना पदोन्नतीने करण्यात यावी. नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने शिक्षकांना १५ टक्के नक्षल भत्ता देण्यात यावा. कास्ट्राईब शिक्षक संघटनेचा एक प्रतिनिधी शिक्षण समितीवर घेण्यात यावा. प्राथमिक शिक्षकांची पती-पत्नी एकत्रीकरण समायोजन बदली ३० कि.मी. आत करण्यात यावी. ३० सप्टेंबर अखेर अतिरिक्त झालेल्या शिक्षकांची कार्यशाळा घेवून समायोजन करण्यात यावे.भारताचे संविधान उद्देशिका छायांकित फोटो प्रत्येक शाळा, कार्यालयात लावण्यात यावी. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव मंजूर करण्यासाठी सेवा ज्येष्ठतेनुसार प्रशिक्षण घेण्यात यावे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दरवर्र्षी देण्यात यावी. मृत्यूमुखी पडलेल्या मागासवर्गीय शिक्षकांच्या पत्नीला सेवानिवृत्त पेन्शन देण्यात यावी.आदी मागण्यांचा समावेश होता. शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्यासह सरचिटणीस संजय ऊके, विरेंद्र भोवते, राजेश गजभिये, अमित गडपायले, अजय शहारे, अविनाश गणवीर इत्यादींचा यांचा समावेश होता.
शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 12:30 AM
जिल्ह्यातील मागासवर्गीय शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सकारात्मक चर्चेतून निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती रमेश अंबुले यांनी कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिली.
ठळक मुद्देरमेश अंबुले : कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे शिक्षण सभापतींना निवेदन