ऑनलाईन लोकमत इसापूर : शिक्षकांना वेठीस धरुन मानसिक त्रास देणाºया शासनाला धडा शिकविणे गरजेचे आहे. असे परखड मत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पवार यांनी व्यक्त केले.महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषद जिल्हा गोंदिया कार्यकारिणीची सभा संत तुकाराम हायस्कूल गोंदिया येथे नुकतीच पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. सभेत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले, राष्टÑहित, शिक्षणहित व शिक्षकहित जोपासणारी मराविप ही एकमेव संघटना असून शैक्षणिक हितार्थ कार्य करणे हेच ध्येय. परंतु जेव्हापासून भारतीय जनता पक्षाचे सरकार राज्यात आले. तेव्हापासून एक ना अनेक जीआर काढून राज्याचे शिक्षणमंत्री व शिक्षण सचिव शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकांना वेठीस धरत असल्याचा आरोप केला.यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी त्यांच्या मार्गदर्शनात खºया अर्थाने शैक्षणिक क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी शाळांमध्ये ज्या मुलभूत सुविधा आधी पुरविण्याची आवश्यकता आहे. त्यांची पूर्तता न करता ‘हम करो सो कायदा’ असे धोरण राबविले जात आहे. पटसंख्येच्या आधारे शिक्षक संच मान्यता, शिक्षकेत्तर कर्मचारी आकृतीबंध यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झाले. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न मार्गी लावण्याऐवजी पद रद्द करण्याचा फतवा काढला. वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी, पदोन्नती शिक्षक अभियोग्यता चाचणी, आॅनलाईन माहिती सादर करने, शाळा डिजीटल लोकवर्गणीतून करने, शालेय पोषण आहार, व शिष्यवृत्ती संबंधिची कार्यवाही, अशैक्षणिक कामे अशा अनेक कारणासाठी शैक्षणिक कामे सोडून शिक्षकांना तासनतास शाळेबाहेर राहावे लागते. शिक्षण विभागातील किती तरी पदे अजूनही रिक्त आहेत. वेतन पथकांची तर व्यथाच आहे. कित्येक वर्षापासून शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या अजूनही पूर्ण होवू शकल्या नाही. याकडे शासनाचे किती लक्ष आहे असा सवाल उपस्थित मान्यवरांनी केला.सभेला नागपूर विभागाचे उपाध्यक्ष राधेश्याम पंचबुद्धे, जिल्हा कार्यवाह गुणेश्वर फुंडे, उपाध्यक्ष विजय मानकर, सहकार्यवाह आतीष ढाले, संघटनमंत्री विरेंद्र राणे, सहसंघटन मंत्री उल्हास तागडे, जी.डी. पटले, कार्यालय मंत्री आनंद बिसेन, कोषाध्यक्ष छत्रपाल बिसेन व अन्य जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन गुणेश्वर फुंडे यांनी केले. आभार छत्रपाल बिसेन यांनी मानले.
शिक्षकांना वेठीस धरणाºयांना धडा शिकविणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:57 PM
शिक्षकांना वेठीस धरुन मानसिक त्रास देणाºया शासनाला धडा शिकविणे गरजेचे आहे. असे परखड मत मार्गदर्शन करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश पवार यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देओमप्रकाशसिंह पवार : शिक्षक परिषदेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक