लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे समाजाचे केंद्रबिंदू असून समाजाला योग्य दिशा देणारे शक्तीशाली संघटन आहे. या संघाच्या शाखेत सुयोग्य कार्यकर्त्यांची निर्मिती केली जाते. योग्य प्रशिक्षण देऊन सुसंस्कारीत युवकांची पिढी तयार करणारे संघ हे संस्कारपीठ आहे. अगदी विषम परिस्थितीत डॉ. हेडगेवार यांनी सन १९२५ मध्ये राष्टÑीय स्वयं सेवक संघाची स्थापना करुन देशाला वैभवशाली राष्टÑ बनविण्याचा संकल्प केला. त्यांनी सुरू केलेले कार्य आजही अविरत सुरू आहे. देशाच्याच नव्हे तर जगाच्या कोनाकोपºयात संघाच्या अनेक शाखा सुरू असून समाजाच्या उत्थानासाठी अनेक उपक्रम सुरु आहेत, असे प्रतिपादन अखिल भारतीय शिक्षा संघटन विद्याभारतीचे महाकौशल प्रांताचे संघटन मंत्री डॉ. पवन तिवारी यांनी केले.ते स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आमगाव नगरच्या राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवानिमित्त शस्त्रपूजन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.यावेळी मंचावर प्रामुख्याने बनगावचे माजी सरपंच राजकुमार फुंडे, भंडारा विभाग संघ चालक दिनेशभाई पटेल, आमगाव नगर संघचालक निताराम अंबुले, नगर कार्यवाह दिनेश शेंडे उपस्थित होते.डॉ. तिवारी म्हणाले, चीनकडून देशाला आव्हन दिले जात आहे. परंतु आपल्या सैनिकांनी डोकलाम भागातून त्यांना परतवून लावले व जगाला मुसद्देगिरीचे दर्शन घडविले. आपणसुद्धा चिनी सामानांचा बहिष्कार करुन चीनला आर्थिक रुपाने दुर्बल करावे. तसेच देशात स्वच्छता अभियान, गोमाता यावर विस्तृत मत व्यक्त करीत डॉ. तिवारी यांनी देशाला विश्वगुरूच्या स्वरुपात बघण्याचे स्वप्न साकार करण्याचे संघाचा संकल्प असल्याचे सांगितले.प्रमुख अतिथी राजकुमार फुंडे यांनी गर्व से कहो हम हिंदू है, हा नारा देत सर्वांनी हिंदू असल्याचा अभिमान बाळगण्याचे आवाहन केले व वंदेमातरम न म्हणाºयांवर कडाडून टीका केली. संघाचे कार्य प्रसिद्धीकरिता नसून ते जनतेच्या हितासाठी असते, असेही ते म्हणाले. सायंकाळी शस्त्रपूजन व भारत मातेच्या छायाचित्राचे पूजन करुन करण्यात आले. यावेळी स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली. प्रौढ व तरुण स्वयंसेवकांनी व्यायामाचे विविध प्रात्यक्षिक केले.प्रास्ताविक व अतिथींचे परिचय नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी करुन दिले. यावेळी नगरातील प्रतिष्ठित नागरिक, लोकप्रतिनिधी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता नगरातील प्रमुख मार्गावरुन स्वयंसेवकांनी पथसंचलन करीत असताना अनेक ठिकाणी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
संघ हे सुयोग्य कार्यकर्ता व संस्कारमय प्रशिक्षण देणारे विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2017 9:09 PM
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे समाजाचे केंद्रबिंदू असून समाजाला योग्य दिशा देणारे शक्तीशाली संघटन आहे. या संघाच्या शाखेत सुयोग्य कार्यकर्त्यांची निर्मिती केली जाते.
ठळक मुद्देपवन तिवारी : विजयादशमी उत्सवानिमित्त शस्त्रपूजन