विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुका मुख्यालयाच्या परिसर आणि सालेकसा शहरातील एकूण १० मार्गासह तालुक्यातील अनेक रस्त्यांची शेकडो रस्त्यांची अक्षरक्ष: वाट लागली आहे. त्यामुळे हे रस्ते आपल्या दुर्दशेवर अश्रूृ गाळत असल्याचे चित्र आहे. जिथे रस्ते तिथे विकास असे म्हटले जाते मात्र रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असल्याने अद्यापही हा तालुका विकासापासून कोसो दूर आहे. सालेकसा शहरातील काही सिमेंट रस्ते दोन तीन वर्षापूर्वी तयार करण्यात आले होते. मात्र या रस्त्यांवर आता खड्डे पडून डबके तयार झाले आहेत. त्यामुळे वाहने सोडा पायी चालणे सुध्दा कठीण झाले आहे.सालेकसा शहरात सर्वात जास्त वर्दळीचे ठिकाण असलेल्या बसस्थानक, आदिवासी गोवारी चौक, सुभाष चौक, बाजार चौक, पोलीस स्टेशन चौक, गडमाता चौक या ठिकाणी उभे राहण्यासाठी सुध्दा जागा नाही. शहरातील दहा मुख्य रस्त्यांची फारच दयनिय अवस्था झाली आहे. बसस्थानक ते बाजार चौक, गोवारी चौक ते सुभाष चौक, सुभाष चौक ते रेल्वे स्टेशन, वन विभाग कार्यालय ते सुभाष चौक, गांधी चौक ते पोलीस स्टेशन मार्ग, गडमाता रोड, पोलीस स्टेशन चौक ते कुंभारगली, रेल्वेस्टेशन ते वनविभाग कार्यालय मार्गाचा समावेश आहे. शहराच्या वर्दळीच्या ठिकाणी व मुख्य बाजारपेठ असलेल्या ठिकाणी रस्ते आणि चौकाची फारच दुर्दशा झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केरकचरा साचला असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.सालेकसा शहराप्रमाणेच तालुक्यातील गावातील रस्त्यांची सुध्दा तीच अवस्था आहे. अनेक गावामध्ये आजही चिखल माती भरलेले रस्ते दिसून आहेत. सिमेंट रस्ते असलेल्या ठिकाणी तर घाण पसल्याचे चित्र आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.परिणामी गावकऱ्यांना साथीच्या आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही गावातील लोक आपली जनावरे सिमेंट रस्त्यावर बांधून ठेवतात. काही गावामध्ये सिमेंट रस्ते बांधण्याच्या नावावर फक्त देखावा करण्यात आल्याचीे बाब पुढे आली. तर काही ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करताना निकृष्ठ दर्जाच्या साहित्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे अल्पावधीत या रस्त्यांची वाट लागली आहे.पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्यानंतर डांबर निघून जात आहे. तालुक्यातील गोवारीटोला, कोटजमूरा, नवेगाव, लटोरी, बाम्हणी, पिपरीया, काहली, भाडीपार, घोन्सी, खोलगड, जांभळी, भजेपार, धानोली, जमाकुडो, दरेकसा या गावांमध्ये चिखलाचे साम्राज्य दिसले.लोकप्रतिनिधीचे दुर्लक्षतालुक्यात दर्जेदार रस्ते निर्मिती करण्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी पावसाळा आला की रस्त्यावर खड्डयांचे आणि चिखलाचे साम्राज्य तयार होते. तालुक्यातील अनेक रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून त्यांची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकºयांची समस्या कायम आहे.दोन वर्षांतच लागली रस्त्यांची वाटएखादा डांबरी रस्ता तयार केल्यानंतर तो दहा ते पंधरा वर्षे तर सिंमेट रस्ता २० वर्षे टिकून राहावा ही अपेक्षा असते. मात्र सालेकसा तालुक्यात मागील दोन तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची पूर्णपणे वाट लागली आहे. त्यामुळे या रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. तर दोन वर्षातच रस्त्यांची वाट लागली आहे.सालेकसा शहराचा संपूर्ण परिसर आत्तापर्यंत आमगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये येत होता. आता याचा समावेश नगर पंचायतमध्ये झाला आहे. नगर विकासाच्या योजनेत शहरातील रस्ते दर्जेदार तयार करण्यात येईल. तसेच पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाईल.-उमेदलाल जैतवार, बांधकाम सभापती नगर पंचायत सालेकसा
दुर्दशेवर अश्रू गाळत आहेत तालुक्यातील रस्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:09 PM
तालुका मुख्यालयाच्या परिसर आणि सालेकसा शहरातील एकूण १० मार्गासह तालुक्यातील अनेक रस्त्यांची शेकडो रस्त्यांची अक्षरक्ष: वाट लागली आहे. त्यामुळे हे रस्ते आपल्या दुर्दशेवर अश्रूृ गाळत असल्याचे चित्र आहे. जिथे रस्ते तिथे विकास असे म्हटले जाते मात्र रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असल्याने अद्यापही हा तालुका विकासापासून कोसो दूर आहे.
ठळक मुद्देविकासाचा दावा ठरतोय फोल : दोन वर्षात सिंमेट रोडवर खड्डे, बांधकामातील साहित्यावर प्रश्न चिन्ह, प्रशासनाचे दुर्लक्ष