ऑनलाईन लोकमतआमगाव : नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून राजकीय व्देषाच्या लढाईमुळे स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या परिसरातील अनेक विकास कामे रखडली असून बेरोजगारीच्या समस्येत वाढ होत आहे. याकडे शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.२७) आमगाव संघर्ष समितीच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात या भागातील नागरिक सहभागी झाले होते.आमगाव नगर परिषद क्षेत्रात रोजगार हमीचे कामे, घरकुल, शौचालये, शेततळे, शासकीय कार्यालयातील नागरिकांची कामे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, अवकाळी पावसामुळे शेतकºयांच्या पिकांचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. संजय निराधार योजना, श्रावणबाळ, स्वस्त धान्य दुकानातील पुरवठा या विषयाला घेऊन आमगाव विकास संघर्ष समिती व सामाजीक कार्यकर्ते धिरेश पटेल यांच्या नेतृत्वात मंगळवारी (दि.२७) दुपारी १२ वाजता गायत्री मंदिर परिसरातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी बीएसपीचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव, रामदास गायधने, रमेश गायधने, तानू तुरकर, मोरेश्वर पटले, श्रीकृष्ण पाथोडे, गिरीधारी डिब्बे, शोभेलाल शिवराजे, पुष्पा समात्र सहभागी होते. शहरातील मुख्य मार्गावरुन हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्च्याचे रुपातंर सभेत झाले. या वेळी धिरेश पटेल यांनी राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजप नगर परिषदेचे राजकारण पुढे करुन नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. केवळ सत्तेसाठी निवडणुकीत पुढे तर नागरिकांच्या समस्यांवर पुढाऱ्यांची पळापळ सुरु आहे. नागरिकांच्या समस्यांवर कुणीही पुढारी समोर येत नाही. अशा पुढाऱ्यांना नागरिकांनी धडा शिकवावा आवाहन पटेल यांनी केले. नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षापासून राजकीय द्वेषामुळे लढाई सुरु आहे. त्यामुळे प्रशासकांचा कार्यकाळ निरंतर सुरु आहे. परंतु प्रशासकांचे कारभार हुकूमशाही सारखा असल्याने बेरोजगारांना काम मिळत नसल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. यानंतर शिष्टमंडळातर्फे विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार साहेबराव राठोड यांना देण्यात आले.
आमगाव संघर्ष समितीचा तहसीलवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:17 AM
नगर परिषद क्षेत्रात मागील तीन वर्षांपासून राजकीय व्देषाच्या लढाईमुळे स्थानिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
ठळक मुद्देविविध समस्यांकडे वेधले लक्ष : तहसीलदारांना निवेदन