लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील मुख्य दूरसंचार विभागासह उपविभाग केंद्राचे वीज बिल थकीत असल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता.त्यामुळे दूरसंचार विभागाने १ हजार हार्स पॉवर क्षमतेच्या बॅटरीवर लीज सेवा सुरू केली आहे. त्यामुळे बँक आणि शासकीय कार्यालयातील कामकाज सुरू आहे. मात्र उपविभागांची सेवा ठप्प असल्याने ग्रामीण भागातील दूरध्वनी सेवा ठप्प आहे.तालुक्यातील शासकीय,खाजगी कार्यालय, बँक, तसेच ग्राहाकांना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी मुख्य दूरसंचार विभागांतर्गत ८ उपविभागीय दूरसंचार केंद्र सेवा देतात. या मुख्य केंद्रासह ८ उपकेंद्रांकडे महावितरण कंपनीचे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.परिणामी तालुक्यातील बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे.टेलीकॉम टेक्नीशीयन यांनी दिलेल्या माहितीनुसार महावितरण कंपनीने गोरेगाव मुख्य दूरसंचार विभागासह उपविभाग कवलेवाडा, कुºहाडी, तिमेझरी, मुंडीपार, पालेवाडा, बबई, चोपा, सोनी यांचा वीज पुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे मुख्य बीएसएनएल विभागात बॅटरी क्षमतेवर केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु ही सेवा डिझेल उपलब्ध झाल्यास १२ तास सेवा सुरळीत चालू राहू शकेल. त्यामुळे बँक कामकाज, २ जी मोबाईल फोन, लिज लाईनमुळे सुरू आहेत. परंतु ४ जी सेवा, वायफाय, ब्रॉडबॅन्ड सेवा, लॉडलाईन सेवा बंद आहेत. या बीएसएनएल विभागात अभियंता कार्यरत नसून रोजंदारी मजूर संजय शहारे,टेलीकॉम टेक्नीशीयन टी.बी. रहांगडाले यांच्यावर या केंद्राची जवाबदारी आहे.रोंजदारी कर्मचारी वेतनापासून वंचितयेथील मुख्य विभागात कार्यरत रोजंदारी मजूर संजय शहारे यांना सहा महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही. टेलीकॉम टेक्नीशीयन टी.बी.रहांगडाले यांना दोन महिन्याचे वेतन मिळाले नाही. कर्मचाऱ्यांना सुध्दा वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे बीएसएनएल विभागाची सेवा उपलब्ध होणार की नाही, असा संभ्रम ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे.
दूरसंचार विभागाची सेवा बॅटरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 6:00 AM
तालुक्यातील शासकीय,खाजगी कार्यालय, बँक, तसेच ग्राहाकांना इंटरनेट सेवा पुरविण्यासाठी मुख्य दूरसंचार विभागांतर्गत ८ उपविभागीय दूरसंचार केंद्र सेवा देतात. या मुख्य केंद्रासह ८ उपकेंद्रांकडे महावितरण कंपनीचे १३ लाख ४५ हजार रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे.परिणामी तालुक्यातील बीएसएनएलची सेवा ठप्प झाली आहे.
ठळक मुद्देउपविभागाची सेवा ठप्प : ग्राहक झाले त्रस्त