शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

दूरदर्शन गाजवलेला ढोलकीवादक करतोय रंगरंगोटीची कामे; कोरोनामुळे उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 12:11 PM

आपल्या मातीचा इमान राखून आणि प्रबोधनात्मक कलेमधून लोककला दंडार वाजवत, परंपरा जोपासलेल्या दादाजी मेश्राम यांची ढोलकी आता बंद झाली आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित, तसेच उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे.

ठळक मुद्देमानधनापासून वंचित दंडार कलावंत दादाजी मेश्रामांची व्यथा

मुन्नाभाई नंदागवळीलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया: एकेकाळी दूरदर्शनवर आपले अधिराज्य गाजवलेली लोककलेचा वारसा जपणारी ढोलकी कोरोनामुळे मूक झाली आहे. आपल्या मातीचा इमान राखून आणि प्रबोधनात्मक कलेमधून लोककला दंडार वाजवत, परंपरा जोपासलेल्या दादाजी मेश्राम यांची ढोलकी आता बंद झाली आहे. वृद्ध कलावंत मानधनापासून वंचित, तसेच उपासमारीची वेळ आली असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली आहे.बाराभाटीचे दादाजी रुका मेश्राम हे संत गजानन महाराज दंडार मंडळात उत्कृष्ठ ढोलकीची थाप वाजवतात, या ढोलकीच्या सुरमयी वाजवण्याने गुजरात, शिल्पग्राम उत्सव उदयपूर, मुंबई दुरदर्शन, पुणे, सातारा, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपुर अशा ठिकाणासह आकाशवाणीवरही या मंडळाची दंडार सादर झाली, या दंडारीला उत्तम ढोलकीची दादाजी मेश्राम यांनी साद दिली. या ढोलकीच्या तालावर महाराष्ट्र राज्यासोबतच दुसरे राज्याचीही वेगळी ओळख निर्माण झाली ही मोठी गौरवाची बाब आहे.दादाजी मेश्राम हे लहान वयापासूनच ढोलकी वाजविण्यात पारंगत आहेत. पण अशा वैविध्यपुर्ण कलाकाराने उच्च स्तर गाठला. मेश्राम यांनी गावातील मंदिरात भजन या कलाप्रकारामध्ये प्रथम ढोलकीची थाप रसिकांना दाखविली, आणि नंतर यांच्या ढोलकी वादणाला किर्तन, तमाशा, संतसंग कार्यक्रम, दिंडी व दंडारीतून रंग चढला. गुजरातमध्ये आजही ही ढोलकी रसिकांना आवडते आहे.मेश्राम हे हल्ली भागवत सप्ताहामध्ये रंगरंगोटी करतात. हरिपाठ मृदुंग, लष्करी लावणी, श्रृंगारी लावणी, ऐतिहासिक लावणी, रामायणी लावणी, भारुळ अशा लोककला प्रकारामध्ये ढोलकीचा साज चढवून आपली ढोलकी मुबंईसह दुरदर्शनपर्यंत पोहोचवली. पण कोरोनामूळे सहा महिन्यांपासून कार्यक्रम नाही. ६५ वर्षांचे असून २०१६ ला आवेदन पत्र सादर करुन वृद्ध कलावंत मानधनसुद्धा लागू झाले नाही.कोरोनाच्या प्रभावाने राज्यातील अनेक भागातील कलाकारांवर कार्यक्रम आर्थिक संकट आले, शासनाला कलावंताच्या कलेची विसर पडू नये, ज्याप्रमाणे चित्रपट व सिनेसृष्टीचे कार्य सुरु केले तसेच गावकुसातील हौशी कलावंताची दखल घ्यावी व कलाकारांची उपासमारी दूर करावी, तरच सांस्कृतिक महाराष्ट्र पुन्हा घडेल. अजूनही वृद्ध कलावंत मानधन सुरु नाही झाले, कोरोनामुळे उपासमारीची परिस्थिती आहे, शासनाने लवकर उपाय सोधून उपासमारी दूर करावी.- दादाजी रुका मेश्रामदंडार ढोलक कलावंत, बाराभाटी. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस