नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद शाळेकडे होणारे दुर्लक्ष पाहून महाराष्ट्र शासनाने प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम अमंलात आणला. गुणवत्तापूर्ण शिक्षण या शाळांमध्ये मिळू लागल्याने विद्यार्थ्यांचा कल आता जि.प. शाळेकडे वाढत असल्याचे चित्र आहे. खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या शाळेने टक्कर द्यावी. यासाठी जिल्ह्यातील १०९९ जि.प.शाळात स्पर्धा सुरू झाली. परिणामी जि.प.शाळांचा गुणवत्ताच नव्हे तर भौतिकही दर्जा वाढल्याने गोंदिया जिल्ह्यात कॉन्व्हेंटमध्ये शिकणारे ४२० विद्यार्थी जि.प.शाळेत परले आहेत.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण करणे व शाळा सिध्दीत गुणांकण वाढविण्यासाठी शाळांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रगत शाळा, डिजिटल शाळा, ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण दिले. शाळांमध्ये आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी स्पर्धा वाढत आहे.१०० टक्के विद्यार्थ्यांचे मराठी वाचन क्षमता विकसीत करणे, गणित संबोध करणे, इंग्रजी वाचन क्षमता, विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे स्पोकन इंग्लीश क्षमता वाढविणे, विद्यार्थी व शिक्षकांचे विज्ञान संबोध विकसीत करणे, शाळेतील सर्व विषयात तंत्रज्ञानाचा कौशल्यपूर्ण वापर करणे, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून देणे, अध्ययन अध्यापनात कृतीयुक्त पध्दतीने सामानिकरण रूजविणे, सामाजिक शास्त्राची स्पर्धा परीक्षेशी सांगड घालणे, शाळेत लोकसहभागातून भौतिक सुविधा मिळविणे, ज्ञानरचनावाद व आनंददायी पध्दतीने शिकविण्यास शैक्षणिक वातावरण निर्मिती करणे, विषयसाधन व्यक्ती व विषयतज्ज्ञ विद्यार्थ्यांचा स्तर निश्चीत करतील, विद्यार्थ्यांना कृतीयुक्त मार्गदर्शन व शिक्षकांना प्रात्याक्षीक देणे, शिक्षकांच्या अडचणी शोधून त्या दूर करणे, शिक्षकांना कार्यप्रवण करणे, भाषा, गणित व इंग्रजी विषयाचे शंभर टक्के कौशल्य मिळविणे, समाज सहभागासाठी व्यवस्थापन समितीची सभा, ग्रामपंचायत भेटी व ग्रामस्थांच्या भेटी घेणे, शाळांची प्रतवारी उंचावणे, शाळा प्रगतीचे अहवाल सादर करणे व शिक्षक परिषदांचे आयोजन करून चांगले कार्य करणाºया शिक्षकांना व्यासपीठ देण्याचेही काम केले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा कल जि.प. शाळांकडे वाढत असल्याचे दिलासा दायक चित्र आहे.खासगी शाळेतील ४२० विद्यार्थी परतलेजिल्हा परिषदेच्या सर्व शाळा बोलक्या करण्यावर भर देण्यात आला. खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या यंदा ४२० झाली आहे.गोरेगाव तालुक्यात ६७, सालेकसा १२, अर्जुनी-मोरगाव ९३, सडक-अर्जुनी ३४, गोंदिया १०६, तिरोडा ६३, देवरी ७ व आमगाव ३८ विद्यार्थ्यांनी खासगी शाळेतून जिल्हा परिषद शाळेत नाव दाखल केले.इंग्रजीतून परिपाठजिल्ह्यातील अनेक शाळेत इंग्रजीतून परिपाठ शिकवला जातो. शाळा शनिवारी दप्तर विरहीत शाळा, बेलमुक्त शाळा आहे. शाळेच्या परिसरातील झाडांना वैज्ञानिक नावे देणे, सामान्य ज्ञानावर दैनिक हजेरी, उन्हाळी विद्यार्थी सार्वजनिक पाणपोई, शालेय परिसरात उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाणठ्याची सोय, शेवटच्या तासिकेला सामान्य ज्ञानावर पाच प्रश्न, विद्यार्थी सूचना तक्रार पेटी, आज माझा वाढदिवस, शालेय परसबाग, विद्यार्थी संचिका, संपूर्ण इंग्रजीतून परिपाठ, गावातील शिक्षण प्रेमींचे दैनिक अभ्यासिका वर्ग, विद्यार्थी रक्षाबंधन, वनराई बंधारा, वार्षिक स्नेहसंमेलन,पालक मेळावा असे उपक्रम राबविले जातात.जि.प. शाळांत भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने जि.प.शाळांकडे पालकांचा कल वाढत आहे. जि.प.मधील दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना व पालकांना आकर्षित करीत आहे.राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी जि.प. गोंदिया
जि.प.शाळांकडे वाढतोय विद्यार्थ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 5:00 AM
जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळा निर्माण करणे व शाळा सिध्दीत गुणांकण वाढविण्यासाठी शाळांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत प्रगत शाळा, डिजिटल शाळा, ज्ञानरचनावाद, कृतीयुक्त शिक्षण दिले. शाळांमध्ये आयएसओ दर्जा मिळविण्यासाठी स्पर्धा वाढत आहे.
ठळक मुद्देदर्जा सुधारला : कॉन्व्हेंटमधील ४२० बालके जि.प.शाळेत परतले, शिक्षण विभागाचे प्रयत्न फळाला