शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सर्वच शाळांचा दहावीचा निकाल यंदा शंभर टक्के (डमी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:22 AM

या प्रकारामुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट आले. त्यानंतर दहावीचा ...

या प्रकारामुळे हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये कोरोनाचे संकट आले. त्यानंतर दहावीचा भुगोलचा पेपर रद्द करण्यात आला. तर नववी पर्यंतच्या अनेक शाळांच्या परीक्षा सुद्धा झाल्या नाही. विद्यार्थी पुढील वर्गात पोहचले. मात्र वर्षभरापासून कोरोना संकट कायम असल्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग अवलंबविण्यात आला. याला काही ठिकाणी प्रतिसाद मिळाला मात्र ग्रामीण भागात नेटवर्क तसेच मोबाईल नसलेल्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, यावर्षीही कोरोना संकटामुळे दहावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. त्यामुळे राज्य शासनाने निर्णय घेत मूल्यमापनाचे धोरण जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.

...................................

दहावी परीक्षेसाठी जिल्ह्यात नोंदणी केलेले विद्यार्थी

दहावीचे एकूण विद्यार्थी- २२५२२

मूले- ११६७३

मुली-१०८४९

.............................

असे आहे नवे सूत्र

-नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के गुण वापरून दहावीचा निकाल जाहीर करायचा आहे.

-निकाल जाहीर करण्याची जबाबदारी शाळांवर आहे. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या जाणार आहेत.

.........................

शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात.....

दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. ही जबाबदारी शाळांवर सोपविली आहे. त्यातच नवव्या वर्गातील ५० टक्के तसेच दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के गुण वापरून हा निकाल घोषित करायचा आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थाी मागील वर्षी कोरोनाच्या दहशतीमुळे शाळेतच आले नाही. अशावेळी त्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ शकतो.

- व्ही.डी. मेश्राम, प्राचार्य मक्काटोला.

......................................................

आता विद्यार्थ्यांना नवव्या वर्गाच्या गुणांद्वारे तसेच अंतर्गत मुल्यमापन वापरून गुण द्यायचे आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शाळामध्ये समिती स्थापन करून विद्यार्थ्यांना गुण द्यायचे असल्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. मात्र ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात नुकसान होऊ शकते.

- धम्मदीप टेंभूर्णे

प्राचार्य विद्यानिकेतन, आमगाव.

.................

मुल्यमापनातून गुण देणे म्हणजे विद्यार्थांची खरी परीक्षा नव्हे. विद्यार्थ्यांना सर्वच विषयाचा अभ्यास व्हावा यासाठी परीक्षा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. परंतु कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांची परीक्षा न घेताच त्यांना मागच्या वर्षीच्या आधारावर मूल्यामापन करून पास करणे शासनाला भाग पडले.

मिलिंद रंगारी,

शिक्षणतज्ज्ञ सातत्यपूर्ण प्रशिक्षण संस्था गोंदिया.

......................

-पालक काय म्हणतात .......

जर परीक्षा झाली असती तर चित्र वेगळे असते. विद्यार्थ्यांना नववी आणि दहावीच्या गुणांद्वारे मुल्यमापन करून गुण द्यायचे असले तरी हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. शिक्षण विभागाने या आधारे विद्यार्थ्यांना गुण न घेता परीक्षा घेऊनच विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षमता तपासूनच निकाल लावायला हवे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास अधिक वाढेल.

- माया शिवणकर, पालक आमगाव

...................

सतत दोन वर्षांपासून विद्यार्थी शिक्षणापासून दूर जात आहे. त्यामुळे भविष्यात याचा फटका विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड कमी होत आहे. मागील वर्षी नवव्या वर्गाच्या परीक्षा न घेताच निकाल लावण्यात आला. त्यातच आता दहावीची परीक्षा सुद्धा घेण्यात आली नाही. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने घ्या पण परीक्षा घ्यायलाच पाहिजे होत्या.

-पूनम हिवश्याम पाऊलझगडे

पालक, किडंगीपार

.......................विद्यार्थी खूश......

दहावीच्या परीक्षेचा तिढा सुटला आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये खुशीचे वातावरण आहे. तर काही विद्यार्थ्यांना हा निर्णय आवडलेला नाही. जे विद्यार्थी मुळातच अभ्यासाबाबात गंभीर नाही, त्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे आनंद झाला आहे. मात्र जे विद्यार्थी शिक्षणाविषयी गंभीर आणि त्यांना भविष्याची काळजी आहे. अशा विद्यार्थ्यांमध्ये मात्र या निर्णयावरून संतापाचे वातावरण आहे. पास व्हायचेच होते तर वर्षभर कशाला मेहनत केली असती, असा प्रश्न आता विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. भविष्यात कुठे नंबर लागायचा असल्यास या गुणांच्या भरवश्यावर कसा नंबर लागेल याचीही चिंता दिसून आली आहे.

...........................

पुढील प्रवेशाचे काय?

दहावीच्या परीक्षेचा तिढा सुटल्यानंतर आता विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील परीक्षेचा चिंता होत आहे. मात्र हा प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्नही त्यांना पडला आहे. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांचा निकाल जून महिन्याच्या अखेरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यांना पुढील वर्गात प्र‌वेश घेता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना निकाल समाधानकारक वाटणार नाही, त्या विद्यार्थ्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार परीक्षा देता येणार आहे.