गोंदिया : आतापर्यंत सर्वाधिक १४ रुग्णांच्या जीव गेल्याची नोंद घेतल्याने जिल्ह्यासाठी काळा दिवस ठरलेल्या रविवारनंतर (दि. ११) आता मंगळवारी जिल्ह्यातील १२ रुग्णांचा कोरोनाने जीव घेतला असून हा दुसरा काळा दिवस ठरला आहे. तर सोबतच ७४२ नवीन बाधितांची भर पडली असून २५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यानंतर आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या २२,१३९ झाली असून १६,५३२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आता ५३६२ रुग्ण क्रियाशील आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी (दि. १३) नवीन ७४२ बाधितांची भर पडली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४३४, तिरोडा ७२, गोरेगाव ११५, आमगाव २६, सालेकसा २०, देवरी २५, सडक-अर्जुनी ३५, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ७ तर इतर राज्ये व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे. तर २५६ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील १६४, तिरोडा ३०, गोरेगाव ५, आमगाव ५, सालेकसा ५, देवरी ९, सडक - अर्जुनी ७, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील ३० तर इतर राज्ये व जिल्ह्यातील १ रुग्ण आहे.
यानंतर आता जिल्ह्यात ५,३६२ क्रियाशील रुग्ण असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील ३२४४, तिरोडा ५५०, गोरेगाव ३१३, आमगाव २५६, सालेकसा १३२, देवरी १७०, सडक - अर्जुनी ४२४, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील २१२, तर इतर राज्ये व जिल्ह्यातील ६१ रुग्ण आहेत. यातील ४०८९ रुग्ण घरीच अलगीकरणात असून, यामध्ये गोंदिया तालुक्यातील २७८७, तिरोडा ३४९, गोरेगाव १८८, आमगाव १३१, सालेकसा ९६, देवरी १०४, सडक - अर्जुनी २६३, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील १३०, तर इतर राज्ये व जिल्ह्यातील ४१ रुग्णांचा समावेश आहे.
----------------------------
मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढताच
जिल्ह्यात आठवड्याभरापासून कोरोनामुळे रुग्णांचा जीव जात आहे. यात रविवारी (दि.११) तब्बल १४ रुग्णांचा जीव गेला असतानाच मंगळवारी १२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील मृतांची संख्या २४५ एवढी झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १४४, तिरोडा ३३, गोरेगाव ९, आमगाव १४, सालेकसा ५, देवरी १२, सडक - अर्जुनी ६, अर्जुनी - मोरगाव तालुक्यातील १२ तर इतर राज्ये व जिल्ह्यातील १० रुग्णांचा समावेश आहे.
---------------------------------
१९४१ अहवाल प्रतीक्षेत
जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात तपासणी केली जात आहे. यामुळे बाधितांची आकडेवारीही सातत्याने वाढताना दिसत आहे. यामध्ये तपासण्यांचे अहवालही प्रलंबित राहात आहेत. मात्र, जेवढे जास्त अहवाल प्रलंबित तेवढे जास्त बाधित निघत असल्याचा अनुभव येत आहे. अशात मंगळवारी १९४१ अहवाल प्रलंबित असल्याने आता बुधवारी किती बाधितांची भर पडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------------------
मृत्यूदर आला १ टक्क्यावर
मागील महिन्यापर्यंत जिल्ह्यातील मृत्यूदर १.२० टक्के एवढा नोंदविला जात होता. मात्र आता जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या मृत्यूंमध्ये त्यात घट झाली असून मृत्यूदर १ टक्क्यावर आला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्याचा दर देश व राज्याच्या तुलनेत घटलेला दिसत आहे. शिवाय द्विगुणित कालावधीही घटला असून १२८ दिवसांवर आला आहे.