शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

सालेकसा तालुक्यात मलेरियाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2021 5:00 AM

जुलै महिन्याच्या  दुसऱ्या आठवड्यापासून दररोज मलेरियाच्या एक दोन रुग्णांची नोंद होत होती. आतापर्यंत संसर्ग झालेल्या एकूण १२७ रुग्णांपैकी तब्बल ११० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत समावेश असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेलगत गावांमधील आहेत. या गावामध्ये दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर मलेरिया रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने वाढते. 

विजय मानकरलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दरवर्षी सर्वाधिक मलेरिया रुग्णांची नोंद सालेकसा तालुक्यात होते. यंदाही तालुक्यात मलेरियाने थैमान घातले आहे. पंधरा दिवसाच्या कालावधीत १२७ हिवतापाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. १२७ पैकी ७३ रुग्ण गंभीर स्वरुपाच्या (पी.एफ.) मलेरिया संसर्गाचे निघाले असून त्यापैकी आतापर्यंत २० रुग्णांना ग्रामीण रुग्णालय सालेकसा किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदियाला रेफर करण्यात आले. मलेरियाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने या परिसरात आरोग्य शिबिर लावण्याची गरज आहे. जुलै महिन्याच्या  दुसऱ्या आठवड्यापासून दररोज मलेरियाच्या एक दोन रुग्णांची नोंद होत होती. आतापर्यंत संसर्ग झालेल्या एकूण १२७ रुग्णांपैकी तब्बल ११० रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत समावेश असलेल्या छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या सीमेलगत गावांमधील आहेत. या गावामध्ये दरवर्षी पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर मलेरिया रुग्ण संख्या सुद्धा झपाट्याने वाढते. सालेकसा तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्र असून केंद्र निहाय मलेरिया संसर्ग बघितला तर प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे आतापर्यंत एकही रुग्ण मिळाला नाही. परंतु प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव अंतर्गत ०३, प्राथमिक आरोग्य केंद्र बिजेपार अंतर्गत १४ आणि प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत एकूण ११० मलेरिया रुग्णांची नोंद झाली आहे. १२७ पैकी ५४ रुग्ण सामान्य स्वरुपाच्या मलेरियाचे ज्याला पीव्ही (प्लामोडियम विवैक्स) म्हणतात. ७३ रुग्ण पीएफ (प्लाजमोडियम फाल्सीपेरम) गंभीर स्वरुपाच्या मलेरियाचे आढळले. गंभीर स्वरुपाचा मलेरिया संसर्ग झाल्यास याचा प्रभाव मेंदूपर्यंत वाढतो आणि सोबतच रक्तातील प्लाज्मा स्तर फारच खाली येतो. अशात रुग्णांना रक्ताची सुद्धा गरज पडत असते. परंतु सुदैवाने आतापर्यंत एकूण ७३ पैकी कोणत्याही रुग्णांना अशी वेळ आली नाही. 

रोगप्रतिकारक क्षमता चांगली- इतर भागांमध्ये पीएफ (प्लाजमोडियम फाल्सीपेरम) मलेरियाचा संसर्ग झाल्यास रुग्ण  दगावण्याची शक्यता असते. ८० टक्के संसर्गात रुग्ण दगावतात परंतु पिपरीया, दरेकसा परिसरातील लोकांना पी.एफ. स्वरुपाचा मलेरियाचा संसर्ग पी.व्ही. स्वरुपाच्या मलेरियापेक्षा जास्त  असूनही रुग्णांना औषधोपचार दिल्यास ते बरे होत आहेत. या मागील कारण म्हणजे या भागातील लोकांची रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे. 

 या गावांमध्ये वाढला संसर्ग-  तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा अंतर्गत पिपरिया, दरेकसा आणि जमाकुडो उपकेंद्रातील गावांमध्ये सर्वात जास्त संसर्ग वाढला असून पिपरिया, टेंभूटोला, बाकलसर्रा, लाकडाटोला, दरेकसा अंतर्गत मुरकुटडोह, दंडारी, टेकाटोला, दलदलकुही, बोईरटोला, नवाटोला, धनेगाव, जमाकुडो अंतर्गत टोयागोंदी, चांदसूरज, बिजेपार या घनदाट जंगलाला लागून असलेल्या गावामध्ये मलेरियाचा संसर्ग सर्वाधिक वाढला आहे. ही गावे मध्यप्रदेश, छत्तीसगड सीमेवर असून सीमेपलीकडे त्या प्रांतातील गावामधून मलेरिया संसर्ग महाराष्ट्रात वाढत आहे. 

यंदाही मलेरियाचे रुग्ण अपेक्षितपणे वाढले असून तालुक्याची व जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा तत्परतेने कार्य करीत आहे. मलेरियावर नियंत्रण ठेवण्यास यश आले आहे. रुग्णांची ओळख करण्यासाठी आरोग्य सेवक प्रत्येक घरी भेट देऊन रक्ताचे नमुने तपासणीसाठी स्वाईप गोळा करीत आहे. -डॉ. अमित खोडणकर, तालुका आरोग्य अधिकारी, सालेकसा

 

टॅग्स :Healthआरोग्य