लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : उन्हाळा सुरू झाला की गृहिणी पापड, कुरडई बनविण्यासह खडा मसाला, मसाल्याचे पदार्थ, चटणी, मसाला बनविण्यासाठी लागणारे पदार्थ, कैरी, लिंबूचे लोणचे आदी कामांना लागतात. वर्षभराचा घरगुती मसाला याच दिवसांत तयार करून ठेवला जात असल्याने बाजारात मसाला खरेदीचे प्रमाण वाढल्याचे किराणा दुकानदार सांगत आहेत.
उन्हाळ्यात मिरचीचे भाव वाढत असल्यामुळे महिला वर्ग आधीपासूनच मिरची खरेदी करून तिला उन्हात वाळवून मग आवश्यकतेनुसार त्यामध्ये गरम मसाला, धने, बडीशेप आदी पदार्थ एकत्र करून मसाला तयार करून घेतात. यंदा मिरचीचे भाव घसरल्याचे दिसत आहे. यामुळे गृहिणीकडून मसाल्यांच्या तयारीला वेग आला असून तिखट बनविणे सुरू करीत आहेत.
स्वयंपाक घरात दरवळला सुगंधमिरची, मिरची पूड, खडा मसाला या महत्त्वाच्या पदार्थांना मागणी वाढली आहे. साधारणपणे मार्चमध्ये घराघरात तिखट बनवण्याची घाई सुरू होते. मिरची खरेदीपासून तिखटासाठी लागणाऱ्या पदार्थांच्या खरेदीची सुरुवात केली जाते.
मसाल्याच्या गिरणीत बनविलेल्या मसाल्याने स्वयंपाकाला विशिष्ट चव येते, हे माहीत असल्याने हल्ली अनेक जण मोठ्या प्रमाणात मसाला बनवून नंतर त्याचे कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटप करतात, असे महिला सांगतात. त्यामुळे मार्च अखेरपासूनच गृहिणींची मिरची व मसाला साहित्य खरेदी- साठीची लगबग सुरू झाली आहे.
असे आहेत मसाल्यातील वस्तूंचे दर
प्रकार आता मागीलतेजपान २०० २००कर्णफूल ९६० १२००जायपत्री २८०० २४००जायफळ ९६० १०००जिरे ३६० ५५०धने १८० २००हळद ३४० १६०शहाजिरा ९६० ८००दालचिनी ४८० ४००काळेमिरे ९६० ७००
उन्हाळ्यातच पापड, कैरीचे लोणचे तयार केले जाते. या दिवसांतच वेळ मिळतो. मसाला व कैरीचा हाच हंगाम असतो. मसालाच नाही तर सर्व प्रकारचे धान्य व अन्य साहित्य वर्षभरासाठी आताच घेऊन ठेवते. - सुजाता बहेकार, गृहिणी
वर्षभर मसाला साठवून ठेवण्यासाठी उन्हाळ्यातच त्याची खरेदी केली जाते. या दिवसात महिला मसाल्यासाठी लागणाऱ्या वस्तू, पदार्थ खरेदी करून घरी मसाला तयार करतात. परराज्यातून मिरची व अन्य मसाला आयात केला जातो. मिरची देखील याच दिवसांत चांगली मिळते. - बालचंद मुलचंदानी, विक्रेता