शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: युगेंद्र पवारांसाठी शरद पवार मैदानात, बारामतीमध्ये भेटी-गाठी वाढवल्या; माळेगाव कारखान्याच्या माजी अध्यक्षांची घेतली भेट
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'माझ्या वडिलांना कुणी त्रास दिला याचं योग्यवेळी उत्तर देऊ'; रोहित पाटलांचा रोख कुणाकडे?
3
विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर! १५ दिवसात जप्त केलेला आकडा पाहून थक्क व्हाल
4
शरयूच्या तीरावर 25 लाख दिव्यांची रोषणाई; उजळून निघाली श्रीरामाची अयोध्या नगरी...
5
साऊथच्या सुपरस्टारला ओळखलं का? 'या' चित्रपटात साकारणार हनुमानाची भूमिका
6
सूचक म्हणाले, 'ही सही आमची नाहीच'; परळीतून करुणा मुंडे यांचा उमेदवारी अर्ज अवैध
7
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
8
Petrol-Diesel Prices : खुशखबर! सरकारच्या निर्णयामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण; पंपमालकांनाही दिवाळीचं गिफ्ट
9
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
10
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
11
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
12
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
13
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
15
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
16
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
17
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
18
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
19
मोठी बातमी: निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत तब्बल १८७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
20
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!

Gondia: गोंदिया जिल्ह्यात 'ती'चा वाढतोय जन्मदर, वर्षभरात २३२६ मुलींनी घेतला जन्म

By कपिल केकत | Published: December 31, 2023 6:29 PM

Gondia News:मुलगा तर वंशाचा दिवा व मुलगी म्हणजे नाहक टेन्शन ही धारणा बाळगून पूर्वी कन्या भृणहत्या केली जात होती. परिणामी मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर फारच कमी होता.

- कपिल केकतगोंदिया - मुलगा तर वंशाचा दिवा व मुलगी म्हणजे नाहक टेन्शन ही धारणा बाळगून पूर्वी कन्या भृणहत्या केली जात होती. परिणामी मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर फारच कमी होता. मात्र बदलत्या काळानुसार लोकांच्या डोक्यात घर करून बसलेली ही धारणा आता बदलत असल्याचे दिसत आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर आजही कमी असला तरी त्यातला फरक मात्र अत्यंत कमी झाला आहे. सन २०२३ मध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या फक्त १९७ एवढी कमी आहे. यामुळेच जिल्ह्यात आता ताईंचा जन्मदरही वाढू लागल्याचे दिसत आहे.

म्हातारपणी मुलगाच आपला सांभाळ करणार, अशी आई-वडिलांची अपेक्षा असते. मात्र मुलांकडूनच आपल्या आई-वडिलांना घराच्या बाहेर काढले जात असल्याचेही कित्येक उदाहरणे दैनंदिन जीवनात बघावयास मिळत आहेत. तर याउलट मुलीच मुलांची जागा घेऊन आपल्या आई-वडिलांचा सांभाळ करताना दिसत आहेत. एवढेच काय तर त्यांना अखेरचा निरोपही मुलीच देत असल्याचेही बघावयास मिळत आहे. म्हणूनच काळानुसार लोकांच्या डोक्यात घर करून बसलेली जुनी धारणा आता संपुष्टात आली असून मुलगा असो वा मुलगी दोघे एकसमान हे सर्वांना उमगले आहे. यामुळेच आता मुलगा-मुलगीमधील फरक कमी होत चालला आहे. नगर परिषद कार्यालयातील नोंदणीनुसार सन २०२३ मध्ये २५२३ मुलांनी तर २३२६ मुलींनी जन्म घेतला आहे. म्हणजेच, मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्या फक्त १९७ एवढी कमी आहे. येत्या काळात हा फरक पूर्णपणे संपून ताईंची संख्या जास्त राहणार यात शंका नाही.

ग्रामीण भागात जनजागृतीची गरज- मुला-मुलींमधला फरक आता कमी झाला असला, तरी ग्रामीण भागात मात्र आजही कित्येक कुटुंबात वंशाला दिवा म्हणून मुलगाच हवा आहे. अशा कुटुंबाच्या नजरेत मुलींना स्थान नाही व मुली जन्माला येऊ नये यासाठी ते कोणत्या तळाला जाऊ शकतात अशी स्थिती असते. नाही तर मुलाच्या नादात अपत्यांची संख्या वाढत जाते. परिणामी, जास्त मुले होऊन त्यांचा सांभाळ करणे कठीण जाते. अशात मुला-मुलींमधील फरक लोकांच्या डोक्यातून काढण्यासाठी ग्रामीण भागात आजही जनजागृतीची गरज आहे. 

सन २०२३ मधील मुले-मुलींची जन्म संख्या

महिना- मुले- मुली

जानेवारी- २१९-१९७

फेब्रुवारी-२१३-१८५

मार्च- १७९-१६९

एप्रिल- २४४-२०२

मे- १५७-१८४

जून-१६५-१३९

जुलै-१९७-२०६

ऑगस्ट- १९३-१८७

सप्टेंबर-२३३-२२६

ऑक्टोबर-२५२-२०८

नोव्हेंबर-१९२-१६८

डिसेंबर- २७९-२५५.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र