शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

दवनीवाडा पोलीस ठाण्यात नवीन कायद्यांतर्गत पहिला अदखलपात्र गुन्हा दाखल

By नरेश रहिले | Published: July 01, 2024 3:25 PM

ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान इतिहास जमा: १६ पोलीस ठाण्यात नविन कार्य प्रणालीचे सॉफ्टवेअर अद्यावत

नरेश रहिलेगोंदिया: केंद्र सरकारने तीन नवीन फौजदारी कायदे संमत केले आहे. त्याची अंमलबजावणी १ जुलै २०२४ पासून करण्यात येणार आहे. या कायद्यामध्ये पोलीस तपासाची कार्यप्रणाली व प्रक्रियामध्ये काही बदल झाले आहेत. पहिल्याच दिवशी गोंदिया जिल्ह्यातील १६ पोलीस ठाण्यांपैकी दवनीवाडा पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व तपास अधिकारी व अंमलदार यांच्या गुन्हे अन्वेषण कामकाजामध्ये अचुकता व गतिमानता येण्यासाठी व गुन्हे दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्याकरीता हे कायदे महत्वाचे ठरणार आहेत. पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणारे शरीराविरूध्दचे गुन्हे, महिला व बालकांविरूध्द घडणारे गुन्हे, मालमत्तेसंबंधी गुन्हे, आर्थिक गुन्हे, संघटित व किरकोळ संघटित गुन्हेगारी, दहशतवादी कृत्य तसेच अपघातासंबंधी गुन्ह्यांच्या कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्यांत भारतीय न्याय संहिता - २०२३ (बीएनएस) ची अंमलबजावणी करतांना पहिल्या अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

केंद्र सरकारने भारतीय दंड संहिता १८६० हा जुना कायदा रद्द करून भारतीय नागरीकांचे हित लक्षात घेऊन देशाचा नवीन कायदा म्हणून भारतीय न्याय संहिता, २०२३ (बीएनएस) २५ डिसेंबर २०२३ रोजी लागू करण्यात आला आहे. १ जुलै २०२४ पासून संपूर्ण देशात भारतीय न्याय संहिता -२०२३ या सुधारित नविन कायद्याची अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. ब्रिटिशकालीन भारतीय दंड विधान संहिता आता इतिहास जमा झाले आहे.

१६ पोलीस ठाण्यात नवीन कायद्याच्या अंमलबाजवणीला सुरूवातभारतीय न्याय संहिता - २०२३ या सुधारित नविन कायद्याची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा, देवरी, चिचगड, डुग्गीपार, अर्जुनी-मोरगाव, नवेगावबांध, केशोरी, गोरेगाव, तिरोडा, दवनीवाडा, गंगाझरी, रावणवाडी, रामनगर, गोंदिया शहर, गोंदिया ग्रामीण या संपुर्ण १६ ठाण्यात नविन कार्य प्रणालीचे सॉफ्टवेअर अद्यावत करून नवीन प्रणाली द्वारे गुन्हे नोंदविण्याची प्रक्रियेला सुरूवात झाली असल्याचे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी लोकमतला सांगितले.

दारूड्यावर अदखलपात्र गुन्हाभारतीय न्याय संहिता -२०२३ ची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणे दवनिवाडा येथे नवीन सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे करण्यात आली. भारतीय न्याय संहिता -२०२३ चे कलम ११५ (२), ३५२ प्रमाणे दारू पिण्यावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिविगाळ करणाऱ्यावर नवीन कायद्यातील पहिल्याच अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाCrime Newsगुन्हेगारी