लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शनिवारी जिल्ह्यात ५ बाधितांची भर पडल्यानंतर रविवारी (दि.१०) बाधितांचा आकडा वाढला असून ६ बाधितांची भर पडली आहे. शिवाय एकाही रुग्णाला सुटी देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता वाढताना दिसत आहे. रविवारी जिल्ह्यात १५ ॲक्टिव्ह रुग्ण झाले होते. यामुळे धोका वाढत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अवघ्या राज्यातच आता कोरोना पाय पसरत असून तोच प्रकार जिल्ह्यातही बघावयास मिळत आहे. जिल्ह्यात हळूवार का असेना मात्र बाधित आढळत असून ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी-जास्त होत आहे; मात्र शनिवारी जिल्ह्यात ५ बाधितांची भर पडल्यानंतर रविवारी त्यात वाढ होऊन ६ बाधितांची भर पडली. शिवाय एकाही बाधिताने कोरोनावर मात केली नसल्याने ॲक्टिव्ह रुग्णसंख्या वाढून १५ झाली आहे.
लसीकरण हाच पर्याय कोरोनाला मात देण्यासाठी लसीकरण हाच पर्याय असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट धोकादायक ठरली नाही. अशात आता प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे; मात्र त्यानंतर कित्येकांनी लस घेतली नसल्याने त्यांनी अगोदर लस घेण्याची गरज आहे.
फक्त २९,१८७ जणांनीच घेतला बूस्टर डोस कोरोनाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर ९ महिन्यांनी अशांना बूस्टर डोस घेण्याची गरज आहे. यात ६० वर्षांवरील नागरिक, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला शासनाकडूनच डोस दिले जात आहेत. तर १८-५९ गटाला सशुल्क डोस घेता येणार आहे; मात्र जिल्ह्यात खासगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण सुरू नसल्याने बूस्टर डोसची संख्या कमी असून फक्त २९,१८७ जणांनीच बूस्टर डोस घेतल्याचे दिसत आहे.