शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

लेटलतीफ कर्मचाऱ्यांना पहिल्याच दिवशी अध्यक्षांनी लावली फटकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 5:00 AM

कर्मचारी कार्यालयीन वेळेत वेळेवर येण्याऐवजी उशिरा येत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या निदर्शनास आल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शुक्रवारी (दि. १३) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच जिल्हा परिषद इमारतीमधील सर्वच कार्यालयात धडक देत संबंधित कार्यालयातील हजेरीपत्रकच आपल्या ताब्यात घेतल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेण्यासाठी अध्यक्षांनी बैठकसुध्दा आयोजित केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : पदभार स्वीकारताच जिल्हा परिषद अध्यक्षांनी आपल्या कामाला सुरुवात केली असून, दुसऱ्याच दिवशी त्यांनी कार्यालयातील सर्वच विभागांमध्ये धडक देत कर्मचाऱ्यांची उपस्थिती बघितली. विशेष म्हणजे, त्यांनी हजेरीपत्रकच ताब्यात घेतले व त्यामुळे कर्मचारी चांगलेच धास्तावले आहेत. गेल्या पावणेदोन वर्षांपासून पदाधिकारी विहीन असलेल्या जिल्हा परिषदेवर प्रशासक राज होते. प्रशासक हे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिले असले तरी त्यांचा पाहिजे तसा वचक कर्मचारी वर्गावर दिसून आला नाही. त्यामुळेच की काय कर्मचारी कार्यालयीन वेळेत वेळेवर येण्याऐवजी उशिरा येत असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्षांच्या निदर्शनास आल्याने नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी शुक्रवारी (दि. १३) आठवड्याच्या शेवटच्या दिवशीच जिल्हा परिषद इमारतीमधील सर्वच कार्यालयात धडक देत संबंधित कार्यालयातील हजेरीपत्रकच आपल्या ताब्यात घेतल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी विविध विकासकामे व योजनांचा आढावा घेण्यासाठी अध्यक्षांनी बैठकसुध्दा आयोजित केली आहे. अध्यक्ष रहागंडाले यांच्या औचक निरीक्षणामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचारी वर्गात एक दहशत निर्माण झाली. त्यामुळे उशिरा येणाऱ्यांवर किती वचक राहतो, याकडे लक्ष द्यावे लागेल. 

 फक्त ‘चार दिन की चांदनी’ नको - यापूर्वीही जिल्हा परिषदेत कित्येक पदाधिकारी व अधिकारी आलेत व गेलेत. पदभार घेताच त्यांनी आपला रुबाब दाखविण्यासाठी अचानक कार्यालय गाठून कर्मचाऱ्यांची उपस्थिती बघणे आदी प्रयोग केलेत. यामुळे सुरुवातीला कर्मचाऱ्यांनाही ते कडक असावे, असे वाटायचे. मात्र काही दिवसांनंतर पुन्हा तीच कार्यप्रणाली सुरू होते, असे आजवर दिसून येत आहे. अशात आता जिल्हा परिषदेचा कारभार तरुणाच्या हाती देण्यात आला असून, त्यांनी कामाची सुरुवात चांगली केली. मात्र, असाच उत्साह कायम असावा, फक्त चार दिन की चांदनी नको.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदEmployeeकर्मचारी