शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

लोकमतने सर्वसामान्यांच्या व्यथा, वेदनांना वाचा फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2022 5:00 AM

लोकमत हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार (दि.२) जुलै रोजी प्रारंभ झाला. यानिमित्त लोकमत जिल्हा कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  लोकमतने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. अनेकांच्या अस्तित्वाला नवीन जागा निर्माण करून दिली.  अनेक तळागाळातील लोकांना स्वत:ची ओळख समाजासमोर करून देण्यास वाव दिला. एवढेच नव्हे तर लोकमतनेे  सर्वसामान्यांच्या व्यथा आणि वेदनांना खऱ्या अर्थाने वाचा फोडली. अनेक समस्या उचलून धरत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच लोकमत हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख वृत्तपत्र असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी केले. ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला शनिवार (दि.२) जुलै रोजी प्रारंभ झाला. यानिमित्त लोकमत जिल्हा कार्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्य संग्राम सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या तैलचित्राला पुष्पांजली व आदरांजली  अर्पण केली. जिल्हाधिकारी गुंडे म्हणाल्या, अन्याय अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तीविरुद्ध लोकमतने आवाज उठविला. लोकमत  म्हणजे लोकांचे मत असून लोकांना त्यांचे मत मांडण्याची मुभा ज्यामुळे मिळाली, त्या बाबूजींना शतश: नमन असल्याचे  सांगितले. जनता आणि प्रशासन यांच्यात योग्य समन्वय साधून प्रशासन लोकाभिमुख करण्यासाठी सहकार्य करावे. तसेच चांगल्या उपक्रमांना लावून धरावे, असे मत व्यक्त केले. जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील म्हणाले, जनतेच्या समस्यांना  उचलून धरून त्याचा प्रामाणिकपणे पाठपुरावा करणे हे वृत्तपत्राचे मुख्य कार्य आहे. लोकमतने ही बाब  सुरुवातीपासूनच जपण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लोकमत हे खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे वृत्तपत्र असल्याचे सांगितले. तर जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्या समस्या मार्गी लावण्यात लोकमतचा  फार मोठा वाटा असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी लोकमतच्या वाटचालीवर प्रकाश टाकत जुन्या  आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. लाेकमत जिल्हा कार्यालयात अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत बाबूजींना आदरांजली वाहिली. यावेळी लोकमत जिल्हा कार्यालयप्रमुख मिलिंद वाढई, लोकमत जिल्हा प्रतिनिधी  अंकुश गुंडावार, लोकमत समाचारचे जिल्हा प्रतिनिधी मुकेश शर्मा, नरेश रहिले, कपिल केकत, लोकमत इव्हेंटचे श्रीकांत  पिल्लेवार, ज्योत्स्ना शहारे व लोकमत जिल्हा कार्यालयातील समस्त कर्मचारी उपस्थित होते. 

 या मान्यवरांची उपस्थिती 

- लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संंपादक व स्वातंत्र्य संग्राम सेेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन लोकमत जिल्हा कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी नयना गुंडे, जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी अनिल पाटील, जि.प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजी आ. राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प. बांधकाम सभापती संजय टेभंरे, जि.प. महिला बालकल्याण सभापती सविता पुराम, पंचायत  समिती सभापती मुनेश रहांगडाले, जि.प. शिक्षणाधिकारी कादर शेख, उपमुख्यकार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, न.प. मुख्याधिकारी करण चव्हाण, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता के.एम.घोरपडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, काँग्रेसचे प्रदेश महासचिव नामदेव किरसान, भाजपचे युवा नेते विशाल अग्रवाल, लक्ष्मीनारायण दुबे, सामाजिक कार्यकर्ते दुलिचंद बुध्दे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश बन्सोड, व्यापारी असोसिएशनचे लक्ष्मीचंद रोचवानी, राज्य कर्मचारी संघटनेचे लिलाधर पाथाेडे, आयटकचे राष्ट्रीय सदस्य हौसलाल रहांगडाले, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, मुख्याध्यापिका अनिता जोशी, योग शिक्षिका माधुरी परमार, डाॅ. सुवर्णा हुबेकर, पुरुषोत्तम ठाकरे, अशोक हरिणखेडे, विठ्ठल भरणे, गोंदिया ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक महेश बन्सोडे, रामनगरचे ठाणेदार केंजळे आदी उपस्थित होते. आमदारांनी वाहिली आदरांजली - मुंबई येथे दोन दिवसांचे अधिवेशन असल्याने जिल्ह्यातील सर्वच आमदार आणि नेते मुंबईत आहेत. त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांनी दूरध्वनीवर जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधत स्व. बाबूजींना आदरांजली अर्पण केली. 

 रक्तदानाने बाबूजींना वाहिली आदरांजली 

- लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून शनिवारी स्थानिक गंगाबाई महिला रुग्णालयाच्या शासकीय रक्तपेढीत रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी सचिन कावळे, रवी कावळे, अजय दमाहे, जयदीपसिंग जडेजा, मनोज कटरे, धवल सहारे, पायल येरपुडे, राकेशकुमार बिसेन, पवार दीक्षित, आवेश शेख, दीपक गायकवाड यांच्यासह अनेक युवकांनी रक्तदान केले. शिबिरासाठी रक्तपेढीचे डॉ. विजयश्री जांगीड, सतीश पाटील, निलेश, राणे, सय्यद सलीम,  राकेश भेलावे, नंदा गौतम, पल्लवी रामटेके, कुणाल जयस्वाल यांनी सहकार्य केले.

बाबूजींच्या आठवणींना उजाळा देत अशोक इंगळे झाले नतमस्तक - लोकमत वृत्तपत्र समूहा’चे संस्थापक संपादक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांना आदरांजली अर्पण करताना माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे यांनी बाबूजींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते उद्योगमंत्री  असताना कशी लोकाभिमुख कामे केली, उद्योगांना चालना देण्याचा कसा प्रयत्न केला, यावर प्रकाश टाकत ते बाबूजींच्या तैलचित्रासमोर नतमस्तक झाले. 

 

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाNayana Gundeनयना गुंडे