नरेश रहिले
गोंदिया: रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रजेगाव काेरणी घाटावर दुर्गा विसर्जन करण्यासाठी गेलेल्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने असंतुलीत झालेल्या ट्रकने गर्दीतील तरूणाचा चेंदामेंदा केला. या घटनेत अनेक लोक व रावणवाडी पोलिस बालबाल बाचवले. उतारवरच ब्रेक फेल झाल्याने देवी घेऊन जाणार ट्रक जोरात धावत पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेटला तोडले. या पोलिसांच्या सर्तकतेने अनेकांचे प्राण वाचले. ही घटना २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७:१५ वाजता दरम्यान घडली. ऋतीक श्रावण अरखेल (२३) रा. पैकनटोली गोंदिया असे मृत तरूणाचे नाव आहे.
गोंदियाच्या पैकनटोली येथील दुर्गा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी ऋतीक अरखेल हा कोरणी घाटावर गेला होता. कोरणी घाटावर मोठ्या प्रमाणात दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या लोकांची प्रचंड गर्दी होती. या गर्दीत कोणतीही अनुचित घटना होऊ नये म्हणून रावणवाडी पोलिसांकडून कडक बंदोबस्त लावण्यात आला होता. इतकेच नव्हे तर सी-६० ची चमू देखील बंदोबस्तासाठी होती. काही दुर्गा मूतर्तीचे विसर्जन होत होते. तर काही मूर्तीची विसर्जनासाठी येत होत्या.
ट्रक क्रमांक एम.एच. ३१ डी.एस.०१६० वर दुर्गा देवीची मूर्ती ठेऊन गोंदियाकडून कोरणी घाटावर येणाऱ्या या ट्रकचे ब्रेक फेल झाले. उतारावरच ब्रेक फेल झाल्याने तो ट्रक भरधाव वेगात येत पोलिसांनी लावलेल्या बॅरीकेटवर धडकला. या ट्रकच्या चाकात एक तरूण अडकल्याने त्याला जागीच मृत्यू झाला. विवेक संतोष डहाट (२३) रा. सावराटोली गोंदिया यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसांनी ट्रक चालक संदिप कलपेश खरे (३१) रा. कोचेवाही ( बनाथर) याच्या विरूध्द भादंविच्या कलम २७९, ३०४ (अ) सहकलम २३९, १७७ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. रावणवाडीचे पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात योग्यरित्या बंदोबस्त करण्यात आला. या घटनेत बंदोबस्त करणारे पोलिस चबालबाल बचावले. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबुरे करीत आहेत.सावराटोली येथील दुर्गा विसर्जनासाठी गेले होते
२४ ऑक्टोबर रोजी सावराटाली येथील येथील दुर्गा दुपारी २:४५ वाजता विसर्जनासाठी काढून कोरणी घाटावर गेली. त्या दुर्गासोबत गेलेले लोक सायंकाळी ६:४५ वाजता कोरणी घाटावर पोहचले. परंतु पोहचल्यानंतर अर्ध्या तासात ही घटना घडली.हळूहळू येणारा ट्रक अचानक धाऊ लागला
दुर्गा विसर्जनासाठी घाटाकडे हळू-हळू जात असलेला ट्रक एम.एच. ३१ डी.एस.०१६० हा अचानक लोकांच्या दिशेने जोराने धाऊ लागल्याने लोक सैरावैरा पळू लागले. तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी लोकांना बाजूला सारत ट्रक चालकाला वाहन थांबविण्यासाठी आवाज देत होते. परंतु तो वाहन थांबविण्याचा प्रयत्न करीत असूनही वाहन थांबत नव्हते. पोलिसांच्या सतर्कतेने मोठी घटना घडली.दोन पोलिस अधिकारी बनले देवदूत
ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने ट्रक गर्दीच्या दिशेने जोराने धावत होता. बंदोबस्तात असलेल्या पोलिसांनी गर्दीला बाजूला सारले इतक्यात धरधाव धावणाऱ्या ट्रकने बॅरीकेटला धडक दिली. बॅरीकेटला धडक होताच ट्रकचा थोडा वेग कमी झाल्याने ड्युटीवर असलेले रावणवाडी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंबुरे व सी-६० चे सहाय्यक पोलीस निरीक्षक करंडे यांनी त्या ट्रकवर उडी घेत त्या ट्रकचा स्टेअरींग फिरविल्याने मोठा अपघात टळला. अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता.