लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शाळांमध्ये मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी राज्यात खळबळ उडाली आहे. अत्याचाराच्या घटना घडू नयेत यासाठी शाळांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी असणे आवश्यक आहे. कारण, महिला कर्मचारीच मुलींवर लक्ष ठेवून त्यांच्या समस्या समजून त्यांचे निराकरण करू शकतात. मात्र, शाळा, आश्रमशाळा व वसतिगृहात महिला कर्मचारीच कमी असल्याने अथवा काही शाळांत महिला कर्मचारीच नसल्याने मुलींवर अत्याचाराच्या घटना घडतात.
जिल्ह्यातील ६४५ शाळांत महिला शिक्षिका नसून योग्यवेळी मुलींचे समुपदेशन होत नसल्याने अशा घटना घडतात. मुली आपला त्रास व समस्या महिला कर्मचारी किवा शिक्षिकांकडे मनमोकळेपणाने सांगू शकतात. मात्र, त्याच समस्या पुरुष कर्मचाऱ्यांकडे सांगताना त्या काहीशा संकोच करतात. परिणामी शाळा अथवा कार्यालयात विपरीत घटना घडतात. त्यामुळे विशेषकरून शाळांमध्ये महिला कर्मचारी मोठ्या संख्येने असाव्यात. शाळांत महिला कर्मचारीच नसतील तर मुलींचे समुपदेशन कसे होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. परिणामी मुलींना त्यांच्या व्यक्त करता याव्या यासाठी शिक्षकांची गरज आहेच.
कसे करणार मुलींचे समुपदेशन?
- मुली या मुळातच लाजऱ्या असतात. त्या सहजासहजी आपल्या समस्या दुसऱ्यांना सांगत नाहीत. शाळेत किंवा रस्त्यात एखादी छेडछाड अथवा पाठलाग झाल्याची घटना त्या आपल्या जवळच्या विश्वासातील व्यक्तीलाच सांगतात
- वर्गशिक्षिका वर्गातील सर्वच • मुलींच्या जवळच्या असतात. त्याच मुलींच्या समस्या समजून घेऊन समुपदेशन करू शकतात. अशात शाळेत महिला शिक्षिकाच नसेल तर समुपदेशन कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होतो.
आकडेवारी काय सांगते?तालुका शाळा शिक्षिका नसलेल्या शाळाआमगाव १५० ५१अर्जुनी-मोर. २०८ ९५देवरी २०० १२४गोंदिया ४१२ ९०गोरेगाव १५६ ४८सडक-अ. १६२ ७१सालेकसा १५० ९८तिरोडा २०४ ६८एकूण १६४२ ६४५
६४५ शाळांत महिला शिक्षकच नाहीजिल्ह्यातील १ हजार ६४२ शाळांपैकी ९९७ शाळांमध्ये महिला शिक्षिका आहेत. तर ६४५ शाळांत शिक्षिका नाहीत. त्यामुळे मुलींच्या अडचणी कोण समजून घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
"अलीकडे महिला व मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत असल्याने अशा परिस्थितीत महिला कर्मचाऱ्यांची उणीव भासते. हे लक्षात घेऊन नजीकच्या काळात होणाऱ्या शिक्षक भरतीत महिलांना नक्कीच प्राधान्यक्रम दिले पाहिजे."- यशोधरा सोनेवाने, गोंदिया