शहरं
Join us  
Trending Stories
1
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
3
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
4
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
5
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
7
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
8
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
10
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
11
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
12
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
13
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
14
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
15
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
16
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
17
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
18
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
19
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
20
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?

हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत होतेय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:11 AM

जंगल व्याप्त गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळतात. या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रूग्णात ७५.४३ टक्यांनी घट झाली आहे.

ठळक मुद्देजनजागृतीची होतोय मदत : पीएफ रूग्णांची संख्या ८६.२५ टक्याने घटली, आरोग्य विभाग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जंगल व्याप्त गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी हिवतापाचे मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळतात. या आजाराला प्रतिबंध लावण्यासाठी आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा हिवतापाच्या रूग्णात ७५.४३ टक्यांनी घट झाली आहे. सदर कालावधीत पीएफ रूग्ण संख्येत सुध्दा ८०.५५ टक्के घट झाली आहे. जुलै २०१८ व जुलै २०१९ या महिन्यांची आकडेवारी पाहता हिवतापग्रस्त रूग्णांत ८१.५६ टक्के व पीएफ रूग्ण संख्येत ८६.२५ टक्यांनी घट झाली आहे. या कालावधीत हिवताप आजाराने एकही मृत्यू झाला नाही.केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या तसेच वरिष्ट कार्यालयाच्या सुचनेनुसार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे राबविण्यात येणाऱ्या किटकजन्य रोग नियंत्रण प्रतिबंधात्मक उपाययोजनेनुसार गोंदिया जिल्ह्यात हिवताप (मलेरिया) या आजाराच्या रूग्ण संख्येत बरच्याच प्रमाणात घट झाली आहे. प्रतिबंधात्मक उपाय योजेंतर्गत जनतेच्या किटकजन्य आजारांबाबत बचावाकरीता घर व परिसर, स्वच्छ ठेऊन परिसरातील झुडपी वनस्पती व गवत नष्ट करावे, घरातील पाणी वापराचे साठे घासून पुसून आठवड्यातून एकदा कोरडे करावे, घरातील पाणी साठे, हौद टाके, रांजन, ड्रम व घरावरील टाकी, गुरांना व पक्ष्यांना पाणी देण्याच्या साधनांमध्ये पाणी साठवू न देण्याची तरतूद करावी. कुलर, फुलदान्या, कुंड्यांमधे पाणी साठवू देऊ नये.शक्य नसल्यास आठवड्यातून एकदा कोरडे करावे. शौचालयाच्या व्हेंट पाईपला कापड किंवा जाळ्या बांधावे, तुंबलेल्या नाल्या व गटारे वाहते करावे, व पाणी साचणारे मोठी डबकी, खड्डे बुजवावे. मच्छरदाणीचा वापर करावा. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरावेत आदी माहिती देण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या माध्यामातून नियमीत गृहभेटी, कंटेनर, सर्वेक्षण,जलदताप रूग्ण सर्वेक्षण, हिवताप दूषीत रूग्ण आढळल्यास त्वरीत उपचार करण्यात येते.चालू वर्षात फक्त ४४ रूग्णसन २०१८ मध्ये एकूण २ लाख २६ हजार ४२ रूग्णांचे रक्त नमुने तपासण्यात आले.त्यात २३२ हिवतापाचे रूग्ण आणि पीएफचे १८० रूग्ण आढळले. सन २०१९ मध्ये २ लाख ४१ हजार २२२ रूग्णांचे रक्त तपासण्यात आले.त्यात ५७ हिवतापाचे रूग्ण आढळले त्यात पीएफचे ३५ रूग्ण आढळले. सन २०१८च्या जुलै महिन्यापर्यंत ४४ हजार २१ रूग्णांचे रक्त तपासण्यात आले.त्यात १४१ हिवतापाचे रूग्ण आढळले त्यात पीएफचे १३१ रूग्ण आढळले. सन २०१९ च्या जुलै महिन्यापर्यंत ५० हजार ४५५ रूग्णांचे रक्त तपासण्यात आले.त्यात २६ हिवतापाचे रूग्ण आढळले त्यात पीएफचे १८ रूग्ण आढळले.ताप आल्यास त्वरीत रक्त तपासणी करा.डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाण्यांचा वापर करा.आजूबाजूचा परिसरात स्वच्छता ठेवा,पाणी साचणार नाही याची काळजी घ्या.-डॉ. वेदप्रकाश चौरागडेजिल्हा हिवताप अधिकारी, गोंदिया.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स