बाराभाटी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी गावात २३ मार्चला रात्री एक वाजल्यापासून तब्बल बारा तास वीज पुरवठा खंडित झाला होता. दोष असल्याने विद्युत विभागाने वीज बंद केली. या प्रकारामुळे येरंडी गावासचार-पाच दिवसांपासून दिवसभर विजेविना काढावेे लागले.
मागील चार-पाच दिवसांपासून या भागात असाच प्रकार सुरू आहे. यामुळे घरगुती वीज ही बंद केल्याने नागरिकांना अंधारात राहावे लागले. किरकोळ दोष असताना वीज पुरवठा होत नसेल तर काय फायदा असा सवाल या परिसरातील वीज ग्राहक करीत आहे.
या गावात विजेची अनेक दिवसांपासून समस्या कायम आहे; पण मागील चार-पाच दिवसांपासून विजेच्या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. वीज पुरवठा खंडित असल्यावर लाईनमनला भ्रमणध्वनीवर विचारायला फोन केला तर फोन उचलत नाही तर कधी बंदच ठेवतात, कधीच माहिती देत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. वीज नाही तर नळाला पाच दिवसांपासून पुरेसे पाणी नाही.
या गावातील नळांना चांगला पाणीपुरवठा होत नाही, टिल्लूपंपाचा वापरही सुरूच असतो, नळांना पाणीपुरवठा सुरळीत व नियमित केला जात नाही. वीज नसली की पाणी मिळतच नाही असे अनेक गंभीर आजार गावात वाढू लागले आहेत. पण, याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे या प्रकाराची ऊर्जा मंत्र्यांकडे तक्रार केली आहे.