शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

सरकारकडून साहित्य नाही, कुटुंबातही विसंवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 5:00 AM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडीमार होत असताना विमा जाहीर करण्यापेक्षा आम्हाला वाढवून दिलेले वेतन वेळेत द्या एवढीच माफक अपेक्षा आशा, अंगणवाडी सेविकांना व्यक्त केली आहे. कोरोनाचे सावट गडद होत असताना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्या व्यक्तीला काय त्रास होत आहे. त्याची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे काम आशा, अंगणवाडी सेविका करीत आहेत.

ठळक मुद्देआशा, अंगणवाडी सेविकांचे आरोग्य धोक्यात : शासनाने घ्यावी दखल

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : घरातून कामासाठी बाहेर पडताना घरच्यांचा राग अनावर होतो आणि बाहेर पडल्यावर कोणी धड माहिती देत नाही. कुठल्याही घरात जाऊन माहिती गोळा करावी लागते. घरी आल्यावर पुन्हा घरच्यांच्या रोखलेल्या नजरा. एवढी मरमर करून उपयोग काय ही व्यथा आहे जिल्ह्यातील आशा, अंगणवाडी सेविकांची.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या योजनांचा भडीमार होत असताना विमा जाहीर करण्यापेक्षा आम्हाला वाढवून दिलेले वेतन वेळेत द्या एवढीच माफक अपेक्षा आशा, अंगणवाडी सेविकांना व्यक्त केली आहे. कोरोनाचे सावट गडद होत असताना अगदी शेवटच्या घटकापर्यंत पोहचून त्या व्यक्तीला काय त्रास होत आहे. त्याची आरोग्यविषयक माहिती संकलनाचे काम आशा, अंगणवाडी सेविका करीत आहेत.या माहितीच्या आधारे आरोग्य विभाग, सरकार दरबारी वेगवेगळ्या योजनांची आखणी होत असताना प्रत्यक्ष काम करणाऱ्या आशा, अंगणवाडी सेविका मोबदल्यापासून वंचित आहेत. कोरोनाच्या सर्वेक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असताना त्यांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य पुरविल्या गेलेले नाही.गोंदिया जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर आशा-अंगणवाडी सेविकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. सर्वेक्षणाच्या जवाबदारीसाठी त्यांना कुठलाही प्रोत्साहनपर भत्ता दिला जात नाही. वेतन नियमित मिळेल हा शब्द नाही. केवळ आशा कार्यकर्त्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे धोक्याचे काम करीत आहेत.या कामात प्रशासनाकडून दुय्यम दर्जाची वागणूक मिळत असताना गाव पातळीवरही काही ठिकाणी त्यांना धक्काबुक्की, अपमान सहन करावा लागतो. दुसरीकडे, घरातही वेगळेच प्रश्न, कशाला बाहेर पडतेस, पगार मिळत नाही. उगाच आजार घेऊन येशील, अशी बोलणी ऐकत घरात रहावे लागत आहे. वेतन वेळेत मिळत नसल्याने आर्थिक अडचणी समोर आहेत.कोरोनामुळे या अडचणी वाढल्या आहेत. दिवसाला सर्वेक्षणाची असणारी सक्ती, अहवाल याचा मोबदला काहीच नाही. कुटूंबातील सदस्य वैतागले असून घरातून कामासाठी बाहेर पडणे कठीण झाले आहे. आशा-अंगणवाडी सेविका तळागाळापर्यंत पोहचून काम करीत आहेत. मात्र शासनाचा त्यांच्याशी संवाद नाही. कुटुंब म्हणत मानधन नाही. कामाच्या वेळा ठरलेल्या नाहीत. आशा-अंगणवाडी सेविकांना किमान आरोग्यविषयक सुविधा पुरविल्या जाव्यात त्यांच्या कामासाठी प्रोत्साहनपर भत्ता देण्याची तरतूद शासनाने करावी अशी मागणी आशा, अंगणवाडी सेविकांना केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक