शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सात वर्षांपासून मिळाला नाही १४ कोटी ७ लाखांचा हिशेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 11:37 PM

महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षिसे वाटली. जिल्ह्यातील ५५६ गावांना पुरस्कारापोटी १४ कोटी ७ लाख २५ हजार रुपये देण्यात आले. या गावांनी नियोजन पत्रीकेनुसारच खर्च केला आहे.

ठळक मुद्देखर्च नियोजन पत्रिकेनुसारच : अंकेक्षण अहवाल पाठविण्यात दिरंगाई

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविताना शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला लोकसंख्येच्या आधारावर बक्षिसे वाटली. जिल्ह्यातील ५५६ गावांना पुरस्कारापोटी १४ कोटी ७ लाख २५ हजार रुपये देण्यात आले. या गावांनी नियोजन पत्रीकेनुसारच खर्च केला आहे. परंतु जिल्हा तंटामुक्त होऊन सात वर्ष लोटले तरी या पुरस्कार रकमेच्या नियोजनाची माहिती शासनाला गेली नाही.जिल्ह्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. यातून अवघ्या चार वर्षात जिल्हा तंटामुक्त झाला. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना लोकसंख्येच्या आधारावर बक्षीसे वाटप करण्यात आली. त्या गावांनी बक्षिसाची रक्कम शासन निर्णयानुसार खर्च केल्याचे दिसून येत आहे. शासन निर्णयाप्रमाणे तंटामुक्तीच्या बक्षीस रकमेतून नवीन बांधकाम करता येत नाही असे स्पष्ट नमूद असल्यामुळे बांधकाम केले नाही. प्रत्येक ग्रामपंचायत प्रचार प्रसिद्धीच्या पैसे खर्च करण्यास मागे राहिली नाही. विनियोग कार्यक्रमासाठी येणारा खर्च प्रचार प्रसिद्धीच्या रकमेतून करण्यात यावा असे स्पष्ट आदेश आहेत. शासनाने साहित्य खरेदीसाठी दरवर्षी १ ते दोन हजार रुपये प्रत्येक ग्रामपंचायतीला दिले. या संदर्भात खंड विकास अधिकाऱ्यांनी या विनियोगाच्या अहवाल शासनाकडे पाठवायचा होता. परंतु अहवाल अद्याप पाठविण्यात आला नाही. या पुरस्काराच्या रकमेचा विनियोग करताना जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत प्रचार प्रसिद्धीवर पैसे खर्च केल्याचे दाखविले.प्रचार प्रसिद्धीस मोडणारे फलक, बॅनर तयार करण्यात आले. शासन ग्लोबल वार्मिंगवर नियंत्रण आणण्यासाठी वृक्षारोपणावरही खर्च करण्यात आला. शासनाने नियोजन पत्रीकेत नमूद केल्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतींनी वृक्षारोपण केल्याचे दाखविले. शासनाने गावाचा विकास व्हावा हा उद्देश ठेवून लाखो रुपये प्रत्येक गावाला वाटले. तंटामुक्त मोहिमेवर शासनाने दिलेले १४ कोटी रुपये योग्य कामावर खर्च झाले आहेत. परंतु अहवाल देण्यास ग्रामसेवक का दिरंगाई करीत आहेत हे कळले नाही.शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम राबविण्यासाठी गावागावात तंटामुक्त समित्या गठित करताना राजकारण आड येते. १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान समिती गठित करायची असते. यासाठी गावागावात आपला अध्यक्ष असावा यासाठी मोर्चेबांधणी केली जाते. समितीवर गावातील शांतीप्रिय व चारित्र्यवान व्यक्ती यावा यासाठी गोंदिया जिल्ह्यातील तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी चारित्र्यप्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे. हल्ली तंटामुक्त अध्यक्षाला गावात मोठी सन्मानाची वागणूक असल्याने या अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू झाली आहे. या मोहीमेत अध्यक्षपदासाठी विविधि राजकीय पक्षाचे कार्यकर्तेही मोर्चेबांधणी करीत आहेत. अध्यक्षपदासाठी राजकारण्यांचा हस्तक्षेप झाल्याने गावागावात अध्यक्ष निवडतांना तणावाचे वातावरण असते. शांतीप्रिय गावासाठी निवडण्यात येणाºया अध्यक्षाच्या निवडीसाठी वाद होणे हे योग्य नाही. तंटामुक्त अध्यक्षाची निवड करतांना गावातील सर्व नागरिकांना चालेल, कोणत्याही पक्षाचा नाही, गावातील जेष्ठ नागरिक व स्वच्छ चारित्र्याचा असल्यास त्या व्यक्तीची अविरोध निवड होते. तंटामुक्त अध्यक्ष निवडतांना निवडणूक न घेता अविरोध अध्यक्षाची निवड करणे गरजेचे आहे. शासन निर्णयाच्या अधिन राहून अध्यक्षाची व समितीच्या सदस्यांची निवड करणे सोयीस्कर राहील.राजकारण्यांचा हस्तक्षेपगावातील प्रत्येक कार्यक्रमात तंटामुक्त अध्यक्षाला मानसन्मान मिळत असल्याने या पदाकडे राजकारण्यांचाही कल आहे. आपल्या पक्षाचा कार्यकर्ता तंटामुक्त अध्यक्षपदी आरूढ व्हावा यासाठी अध्यक्ष निवडतांना राजकारण करणारे व्यक्ती हस्तक्षेप करतात. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी आपल्या कार्यकर्त्यांना तंटामुक्त अध्यक्ष बनविण्याच्या नादात अध्यक्ष निवडतांना हमरी-तुमरी होते. राजकारण्यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी गावकºयांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.चारित्र्याची अट पाळत नाहीमहात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी गोंदिया जिल्ह्यात चारित्र्य प्रमाणपत्राची अट लावण्यात आली. मात्र अनेक ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र सादर न करताच अध्यक्षपदी आरूढ होतात. अध्यक्षपदी चारित्र्यवान व्यक्तीची निवड व्हावी या उद्देशाला तिलांजली देण्याचा प्रकार सुरु आहे. मागील सात वर्षापासून चारित्र्य प्रमाणपत्राची अट लावण्यात आल्याने जिल्ह्यातील तंटामुक्त अध्यक्षपदी चारित्र्यवाद व्यक्तीची होणे अपेक्षित आहे. मोहीम सुरू झाल्यानंतर सलग अनेक वर्ष पदाच्या हव्यासापोटी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदावर आरूढ होतात. या प्रकारावर लगाम लावण्यासाठी अध्यक्षाला चारित्र्य प्रमाणपत्राची अट घालण्यात आली आहे.