लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : दैनंदिन जनजीवन रूळावर आणण्यासाठी राज्य शासनाने राज्य परिवहन महामंडळाला आता गावांपर्यंत फेऱ्यांची परवानगी १५ जूनपासून दिली आहे. मात्र जिल्ह्यात प्रवाशांचा प्रतिसादच नसल्याने सध्या तालुकास्थळापर्यंत सुरू असलेल्या फेऱ्यांचा जेमतेम डिझेल खर्च निघत असल्याची माहिती आहे. यामुळे जिल्ह्यात सध्यातरी गावापर्यंत लालपरी धावणार नाहीच अशी माहिती आहे.देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने ‘लॉकडाऊन’चे टप्पेही वाढत चालले असून अशात मात्र सुमारे २ महिने कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या काळात राज्य शासनाने रेल्वे, बस, उड्डाण व जल वाहतूकही बंद पाडली होती. मात्र याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावरही पडत होता. विस्कटलेली ही घडी पुन्हा बसविण्यासाठी राज्य शासनाने मे महिन्यात राज्य परिवहन महामंडळाला तालुकास्थळापर्यंत बस फेऱ्या सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार, जिल्ह्यात गोंदिया आगाराच्या ५० फेऱ्या सुरू असून यातून जेमतेम डिजेल खर्च निघत आहे. कोरोनाच्या दहशतीने नागरिक गावातल्या गावात किंवा परिसरातच आपली कामे आटोपून घेत असून बसने प्रवास करणे टाळत असल्याचे दिसत आहे. परिणामी बस फेऱ्यांना प्रतिसादच नाही. त्यात आता राज्य शासनाने सोमवारपासून (दि.१५) गावापर्यंत फेऱ्या सोडण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र जिल्ह्यात तालुकास्थळापर्यंतच्या फेऱ्यांनाच प्रतिसाद नसताना गावापर्यंत फेऱ्या चालवून काहीच फायदा निघणार नाही.उलट नुकसान होण्याचीच जास्त शक्यता दिसून येत आहे. नेमकी हीच बाब हेरून जिल्ह्यात सध्या तरी गावापर्यंत बस फेऱ्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामुळेच गावापर्यंत लालपरी पोहचणार नसल्याचे दिसत आहे.रूग्ण संख्येने जिल्हावासी दहशतीतगोंदिया जिल्ह्यात सुरूवातीला १ रूग्ण निघाल्यानंतर सुमारे ३९ दिवस जिल्हा कोरोनामुक्त होता. त्यानंतर मात्र जिल्ह्यात स्फोटच झाला व ही आकडेवारी आजघडीला १०१ पर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील फक्त देवरी तालुक्यातून रूग्ण आढळून आले नसून उर्वरित ७ तालुक्यात रूग्ण मिळून आले आहेत. रूग्ण वाढीची ही संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हावासी दहशतीत आले आहेत. त्यामुळे गावातून बाहेर निघणे व त्यातल्या प्रवास करण्याचा धोका सर्वच टाळत आहेत. परिणामी एसटी फेऱ्यांना प्रतिसाद नाही.
गावापर्यंत लालपरी नाहीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 5:00 AM
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर २२ मार्चपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात आले. कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याने ‘लॉकडाऊन’चे टप्पेही वाढत चालले असून अशात मात्र सुमारे २ महिने कडक ‘लॉकडाऊन’ करण्यात आले होते. या २ महिन्यांच्या काळात राज्य शासनाने रेल्वे, बस, उड्डाण व जल वाहतूकही बंद पाडली होती. मात्र याचा परिणाम राज्याच्या तिजोरीवर आणि राज्यातील नागरिकांच्या दैनंदिन जनजीवनावरही पडत होता.
ठळक मुद्देप्रतिसाद नाही : जेमतेम डिझेल खर्च निघतोय