लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या ३८८ इमारती जीर्ण झाल्या असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर अंगणवाडीतील चिमुकले सुद्धा सुरक्षित नसून तब्बल ३१५ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्याच जीर्ण इमारतीत हे चिमुकले बसत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.बालकांना सुदृढ आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी लागावी. यासाठी बालपणापासूनच अंगणवाडीत दाखल केले जाते. परंतु बालमनावर संस्कार टाकणाऱ्या ह्या अंगणवाड्या चिमुकल्यांसाठी कर्दनकाळ ठरत असल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार हे वास्तव पुढे आले आहे.जिल्ह्यातील ३१३ अंगणवाड्यांची इमारती जीर्णावस्थेत आहेत. यात आदिवासी दुर्गम क्षेत्रातील १०५ तर बिगर आदिवासी क्षेत्रातील २०८, दलित वस्तीतील ११६ अंगणवाड्यांचा यात समावेश आहे. जिल्ह्यातील १ हजार ५४७ अंगणवाड्या व १३२ मिनी अंगणवाड्या आहेत. यात ३६ अंगणवाड्यांसाठी इमारती नाहीत. आठ अंगणवाड्यांसाठी निधी मिळाला आहे. याव्यतिरीक्त २८ अंगणवाड्या इमारतीविना आहेत. तर ३१३ अंगणवाड्याच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. यात आदिवासी दुर्गम भाग (टीएसपी) च्या १०५ तर इतर आदिवासी क्षेत्र (ओटीएसपी) च्या २०८ अंगणवाड्यांचा समावेश आहे. आदिवासी दुर्गम क्षेत्रात ५० टक्के आदिवासी आहेत. इतर आदिवसाी क्षेत्रात ५० टक्के आदिवासी समाज आहे. दलित वस्तीत असणाºया ११६ अंगणवाड्यांच्या इमारतींची अवस्था जीर्ण झाली आहे.या अंगणवाडीत शिक्षण घेणाºया बालकांना धोका पत्थकारुन शिक्षणाचे धडे दिले जाते. अंगणवाड्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्यामुळे कोणत्या अंगणवाडीत बालकांना ठेवता येईल. कोणत्या ठिकाणी ठेवता येणार नाही.यासंदर्भात जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण विभागाने जि.प. च्या कार्यकारी अभियंता यांना पडताळणी करण्याचे पत्र दिले. या पडताळणीनंतर कोणत्या अंगणवाड्याच्या इमारती अखरेच्या घटका मोजत आहे.
चिमुकल्यांना सुरक्षित छत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:13 PM
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या ३८८ इमारती जीर्ण झाल्या असल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर अंगणवाडीतील चिमुकले सुद्धा सुरक्षित नसून तब्बल ३१५ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण झाल्या असून त्याच जीर्ण इमारतीत हे चिमुकले बसत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
ठळक मुद्दे३१५ अंगणवाड्यांच्या इमारती जीर्ण : प्रशासनाची डोळेझाक