लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात मुलांसाठी व्हेंटिलेटरची सोय नाही. हे खरे आहे. परंतु नियमानुसार बालकांसाठी या रुग्णालयात व्हेंटीलेटर ठेवता येत नाही. या रुग्णालयात महिलांसाठी व्हेंटीलेटर असायला हवे. परंतु ते ही मागील पाच वर्षापासून नसून यावर्षी व्हेंटिलेटरसाठी हाय डिपेंडंसी युनिट तयार करण्यात येत आहे.बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय लेवल टू सुविधेचे हॉस्पीटल आहे. तर लेवल वन चे हॉस्पीटल मेडीकल कॉलेज असते. लेवल वन मध्ये व्हेंटीलेटर असणे आवश्यक असल्याचे शासनाने ठरविले आहे. बाई गंगाबाई रुग्णालयात बालकांसाठी व्हेंटीलेटर असणे आवश्यक नाही. परंतु महिलांसाठी व्हेंटीलेटरची सोय या रुग्णालयात खाटांच्या संख्येनुसार असणे आकश्यक आहे.गंगाबाई स्त्री रुग्णालयात सुरुवातीला ८० खाटांचा दर्जा होता. त्यानंतर १२० खाटा व २०११ मध्ये २०० खाटांचा दर्जा देण्यात आला. या २०० खाटांनुसार महिलांसाठी गंगाबाई रुग्णालयात व्हेंटिलेटर ठेवणे आवश्यक आहे. परंतु महिलांसाठी आतापर्यंत व्हेंटिलेटर उपलब्ध नाही. त्या महिलांना आता व्हेंटिलेटरची सेवा देण्यासाठी हाय डीपेंडंसी युनिट तयार करण्यात येत आहे.विशेष म्हणजे, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाला २०११ मध्ये २०० खाटांचा दर्जा मिळाला. परंतु जागेअभावी या रुग्णालयात आतापर्यंत १२० खाटाच आहेत. उर्वरीत खाटा लावण्यासाठी नवीन इमारत तयार करण्यात आली. परंतु त्या इमारतीला मेडीकल कॉलेजसाठी देण्यात आल्यामुळे गंगाबाईच्या खाटा वाढविता आल्या नाही.व्हेंटिलेटरसाठी मनुष्य बळही नाहीखासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाला दिवसाकाठी १० हजार रुपये खर्च येतो. एकाच दिवसात आॅक्सिजनचे तीन सिलेंडर खर्च होतात. व्हेंटिलेटर कक्षाला स्वच्छ वातानुकुलीत खोली असणे आवश्यक आहे. या व्हेंटिलेटर ला हाताळणारा तज्ञ कर्मचारीवर्ग असणे आवश्यक आहे. परंतु मनुष्यबळही नाही व व्हेंटिलेटर नाही, अशी अवस्था गंगाबाई रुग्णालयाची आहे.जिल्हा शल्य चिकित्सकाने सोय करावीबाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात महिला व १२ वर्षाखालील मुलांचा उपचार केला जातो. परंतु १२ वर्षापेक्षा अधिक वयाच्या मुलांचा उपचार केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात येतो. बालकांच्या उपचारासाठी व्हेंटिलेटरची सोय केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. परंतु केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर १३ वर्षापासून त्यावरील बालकांनाही उपचारासाठी बाई गंगाबाई रुग्णालयात पाठवितात. जिल्हा शल्य चिकित्सकांनी १२ वर्षावरील मुलांचा उपचार करण्यासाठी त्यांनी सोय करायला हवी.
गर्भवतींसाठी व्हेंटीलेटर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 12:10 AM
बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात मुलांसाठी व्हेंटिलेटरची सोय नाही. हे खरे आहे. परंतु नियमानुसार बालकांसाठी या रुग्णालयात व्हेंटीलेटर ठेवता येत नाही. या रुग्णालयात महिलांसाठी व्हेंटीलेटर असायला हवे. परंतु ते ही मागील पाच वर्षापासून नसून यावर्षी व्हेंटिलेटरसाठी हाय डिपेंडंसी युनिट तयार करण्यात येत आहे.
ठळक मुद्देमुलांसाठीही सुविधा नाही : महिलांसाठी हाय डीपेंडन्सी युनिट