लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले असून नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई आहे. अशात घराबाहेर फिरणाऱ्यांवर कारवाया केल्या जात असल्या तरिही गोंदियात पोलिसांकडून सूट दिल्याचे चित्र आहे. परिणामी नागरिकांची गर्दी वाढत चालली असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे. मात्र असे असतानाही नागरिक ‘लॉकडाऊन’ला गांभीर्याने न घेता सुटीचा काळ समजून घेत घराबाहेर पडत असल्याचे दिसत आहे.जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरिही यानंतर पुढे काही अप्रिय घडणार नाही याची शाश्वती देता येत नाही.अशात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरवासीयांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना पाळायचे नाही असेच काहीसे ठरवून घेतल्याचे दिसत आहे. यामुळेच मोठ्या संख्येत नागरिक घराबाहेर पडत असून शहरातून ‘लॉकडाऊन’ हटविण्यात आल्यासारखे वाटत आहे. अशात त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याने नागरिकांना रान मोकळे असून ते सर्रास नियमांना तुडवित फिरत असल्याचे बघावयास मिळत आहे.शिथिलतेनंतर चित्रच पालटलेसोमवारपासून (दि.२०) कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यांना दिलासा देत थोडी शिथिलता देण्यात आली आहे. व्यापार व उद्योगांना सूट देण्यात आल्याने शहरातील चित्रच पाटल्याचे दिसले.कित्येक दुकाने उघडण्यात आल्याने नागरिकांनी जणू ‘लॉकडाऊन’च हटविण्यात आल्याचे गृहीत धरून घराबाहेर पडण्यास सुरूवात केली.परिणामी सोमवारी शहर ‘लॉकडाऊन’ मुक्त झाल्यासारखेच वाटले.सर्रास फिरणे सुरूच‘लॉकडाऊन’ असतानाही पोलीस विनाकारण फिरणाऱ्यांना काहीच करीत नसल्याने नागरिक ही मोकाटपणे फिरताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, घराबाहेर फिरूनही आतापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात कारवाया झालेल्या नसल्याने नागरिकांना रानमोकळे असून ‘काही होत नसल्याच्या आवात’ ते सर्रास फिरत आहेत.त्यामुळे आता उरलेल्या १०-१२ दिवसांसाठी तरी सुरक्षेच्या दृष्टीने कठोरपणा बाळगणे गरजेचे झाले आहे.
नागरिकांमध्ये काही होत नसल्याचा आव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 5:00 AM
देशात झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून त्यातही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यावर नियंत्रण मिळविता यावे म्हणून अवघ्या देशात ‘लॉकडाऊन’ करण्यात आले आहे. विशेष म्हणजे ‘लॉकडाऊन’ची मर्यादा वाढवूनही कोरोनाचा कहर सुरूच असून तासा-तासांनी रूग्ण वाढत चालले आहे. अशात आपल्या घरात राहूनच सुरक्षित राहता येणार अशी स्थिती आहे.
ठळक मुद्देपोलिसांकडून सूट : नागरिकांमध्ये भीतीच नाही, कठोर कारवाईची गरज